मराठी बातम्या /बातम्या /देश /'माध्यमांसमोर अनावश्यक विधानं देणं टाळा'; पंतप्रधानांनी नव्या मंत्र्यांना दिले 'हे' महत्त्वाचे सल्ले

'माध्यमांसमोर अनावश्यक विधानं देणं टाळा'; पंतप्रधानांनी नव्या मंत्र्यांना दिले 'हे' महत्त्वाचे सल्ले

पंतप्रधान मोदी  (PM Narendra Modi) मंत्र्यांना म्हणाले, की माध्यमांसमोर अनावश्यक विधानं करण्यापासून वाचण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या मीटिंगमध्ये जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि इतर जुन्या मंत्र्यांचा उल्लेख केला नाही.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली 09 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet Expansion) झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंत्र्यांना कोरोना महामारीच्या (Coronavirus) धोक्याबाबत सावध केलं आहे. ते म्हणाले, की कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे, आपण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासोबतच पंतप्रधानांनी मंत्र्यांना असा सल्ला दिला आहे, की माध्यमांसमोर अनावश्यक विधान करणं टाळा.

महाराष्ट्र, केरळातील रुग्णसंख्या पाहून मोदींनी व्यक्त केली चिंता, म्हणाले...

पंतप्रधान मोदी म्हणाले, की मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणांहून गर्दी झाल्याचे फोटो समोर आले आहेत. लोक विना मास्क (Face Mask) आणि सोशल डिस्टन्सिंगशिवाय (Social Distancing) फिरत राहतात. हे चित्र चांगलं नाहीये. ते म्हणाले, की डॉक्टर आणि फ्रंटलाईन वर्कर्सच्या मदतीनं आपण कोरोनाविरोधात लढा देत आहोत. लसीकरणाचा वेगही वाढवला गेला आहे. टेस्टिंग स्पीड वाढवलं आहे. अशात कोणीही हलगर्जीपणा करू नये.

'त्या' 12 मंत्र्यांचा राजीनामा घेण्यामागचं कारण आलं समोर; स्वत: मोदींनी सांगितलं

पंतप्रधान मोदी मंत्र्यांना म्हणाले, की माध्यमांसमोर अनावश्यक विधानं करण्यापासून वाचण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या मीटिंगमध्ये जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि इतर जुन्या मंत्र्यांचा उल्लेख केला नाही. त्यांनी सांगितलं, की केवळ आपल्या मंत्र्यालयाबाबतच्याच मुद्द्यांवर बोला. आपल्या मंत्रालयावर फोकस करा आणि सरकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा. सरकार आणि मंत्रालयाच्या कामाचा सोशल मीडियावर योग्य पद्धतीनं प्रचार करा. आपल्या डिपार्टमेंटचा योग्य अभ्यास करून सर्व समजून घ्या. जुन्या मंत्र्यांच्या अनुभवातून काही गोष्टी शिका. तुम्हा सर्वांना खूप मेहनत करावी लागेल. मेहनतीचच फळ मिळतं. सामान्य लोकांच्या आयुष्यात बदल होईल असं काम करा, असं आवाहनही पंतप्रधानांनी मंत्र्यांना केलं आहे. आपल्याला देशासाठी काम करायचं आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.

First published:
top videos

    Tags: PM narendra modi, Union cabinet