नवी दिल्ली, 8 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet Expansion) झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मंत्रिपरिषदेची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सबका साथ, सबका विकासचा मंत्र दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मंत्र्यांना त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करत एक नवी ओळख बनवण्यावर भर देण्यास सांगितले. तसेच आपल्या मंत्रालयाच्या संदर्भातील कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना बाबत एक चिंताही (PM Narendra modi concerned over coronavirus) व्यक्त केली आहे. गर्दीचे फोटो, व्हिडीओ पाहून पंतप्रधान चिंताग्रस्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात सांगितले की या कोविडच्या या संकट काळात गेल्या काही दिवसांपासून असे काही फोटो आणि व्हिडीओज पहायला मिळत आहेत ज्यात नागरिक विनामास्क फिरत आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करताना दिसत नाहीयेत. हे दृश्य चांगले नाहीये आणि यामुळे एक चिंता वाढत आहे.
In the Council of Ministers meeting, PM Modi said that over past few days, we all have been seeing pictures and videos of crowded places and people roaming about without masks or social distancing. This is not a pleasant sight and it should instill a sense of fear in us: Sources pic.twitter.com/04cCMV3twO
— ANI (@ANI) July 8, 2021
महाराष्ट्र, केरळमधील रुग्णसंख्येवरुन चिंता महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत अद्यापही वाढ कायम आहे तसेच केरळमध्येही रुग्णसंख्येत वाढ होत आहे यावरुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
PM Modi also expressed concern at the persistently high number of cases coming from Maharashtra and Kerala: Sources pic.twitter.com/rUL2peKOs6
— ANI (@ANI) July 8, 2021
Cabinet Expansion: …म्हणून ‘त्या’ 12 मंत्र्यांना दिला नारळ; स्वत: पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण पंतप्रधान पुढे म्हणाले की, आम्ही कोरनोा विषाणू विरुद्ध संपूर्ण उत्साहाने लढा देत आहोत. देशात लसीकरण देशील खूप वेगाने सुरू आहे. अशावेळी कुठेही दुर्लक्ष होऊ नये. एका चुकीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि कोविड विरुद्ध सुरू असलेला लढा कमकुवत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरूवात झाली आणि नागरिकांनी मोकळेपणाने फिरण्यास सुरूवात केली. मात्र, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाहीये. अनेक देशांतील कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. नागिरकांनी घाबरण्याचे काम नाही पण खबरदारी घेण्याचे आवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.