जाहिरात
मराठी बातम्या / देश / राहुल गांधींच्या दंड्याला मोदींचं सूर्यनमस्काराने उत्तर, लोकसभेत रंगला सामना

राहुल गांधींच्या दंड्याला मोदींचं सूर्यनमस्काराने उत्तर, लोकसभेत रंगला सामना

राहुल गांधींच्या दंड्याला मोदींचं सूर्यनमस्काराने उत्तर, लोकसभेत रंगला सामना

मी पुढचे 6 महिने मी सूर्यनमस्कार घालून स्वत: फिट होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना राहुल गांधींना टोला मारला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : मी पुढचे 6 महिने मी सूर्यनमस्कार घालून स्वत: फिट होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना राहुल गांधींना टोला मारला. देशातल्या तरुणांना रोजगार मिळाले नाहीत तर हे तरुण 6 महिन्यांत पंतप्रधान मोदींना दंड्याने मारतील, असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. त्याला त्यांनी उत्तर दिलं. पंतप्रधानांच्या भाषणात राहुल गांधींनी आक्षेप घेतला तेव्हा मोदी म्हणाले, मी 40 - 45 मिनिटं बोलतोय पण यांना आत्ता करंट लागला. काहीजणांचं ट्यूबलाइटसारखं असतं, असाही शेरा मोदींनी मारला. ‘गांधीजी तुमच्यासाठी ट्रेलर’ दिल्ली विधानसभेच्या निवडणुका, CAA आणि NRC विरुद्धचं आंदोलन यामुळे पंतप्रधान काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पंतप्रधानांनी भाषणाच्या सुरुवातीलाच काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेसच्या मार्गाने गेलो असतो तर राम मंदिर आणि 370 सारखा प्रश्न हा सुटलाच नसता. ज्यांनी केवळ राजकारण करण्यासाठी असे विषय दशकांपासून तसेच ठेवले होते. तीन तलाकचा मुद्दाही त्यांनी असाच प्रलंबित ठेवला होता. (हेही वाचा : भव्य आणि दिव्य राम मंदिराच्या निर्मितीसाठी मोदी सरकाने दिली 1 रुपया देणगी) जुन्या मार्गानं गेलो असतो तर परिवर्तन झालं नसतं. आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी दिली. आम्ही निर्णयांची घाई का करतोय अशी विरोधकांना चिंता आहे. याचवेळी विरोधकांनी भाषणादरम्यान गोंधळ घातला. गांधीजी आमच्यासाठी जीवन पण तुमच्यासाठी ट्रेलर. राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात नवभारतासाठीचा मार्ग दाखवला. कॉंग्रेसच्या मार्गानं गेलो असतो तर कलम 370 रद्द करु शकलो नसतो, तुमच्यासारखं काम मला करायचं नाही. असंही त्यांनी सांगितलं. ईशान्येकडची राज्यं व्होटबँक नाही भारत - बांग्लादेश वाद कधी संपलाच नसता. शत्रू संपत्ती कायदा मंजूर झाला नसता, आम्ही वेगाने 37 कोटी बँक अकाऊंट उघडले नसते, 13 कोटी गॅस मिळाले नसते. 2 कोटी नवे घरं झालीच नसती. दिल्लीत 1700 पेक्षा जास्त अवैध कॉलनी अधिकृत झाल्या नसल्या. 11 कोटी लोकांच्या घरात टॉयलेट बांधली नसती. ईशान्येकडची राज्यं आमची वोट बँक नाही, असंही मोदी म्हणाले. ====================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात