भव्य आणि दिव्य राम मंदिराच्या निर्मितीसाठी मोदी सरकाने दिली '1 रुपया' देणगी

भव्य आणि दिव्य राम मंदिराच्या निर्मितीसाठी मोदी सरकाने दिली '1 रुपया' देणगी

अयोध्येत भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार एका ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.

  • Share this:

नवी दिल्ली 6 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी बुधवारी संसदेत मोठी घोषणा केली होती. त्यासाठी खास ट्रस्ट तयार करण्यात आला असून त्या ट्रस्टकडे मंदिर बांधकामाचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. यात 15 सदस्य राहणार असून त्यात एका दलित मान्यवराचाही समावेश असणार आहे. या ट्रस्टला राजधानी दिल्लीत कार्यालयासाठी जागीही देण्यात आलीय. ट्रस्टच्या स्थापनेनंतर केंद्र सरकारकडून प्रतिकात्मकरुपात ट्रस्टला 1 रुपयाची देणगी देण्यात आलीय. ट्रस्टला मिळालेली ही पहिलीच देणगी आहे.

अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली होती. अयोध्येत भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार एका ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट असं त्या ट्रस्टचं नाव असून सर्व 67 एकर जमीन या ट्रस्टला दिली जाणार आहे. त्याचबरोबर मशिद बांधण्यासाठी सुन्न वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्यासाठी कार्यवाही सुरु झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पवारांना टार्गेट करणारा भाजपचा नेता शिवसेनेच्या संपर्कात? CM ठाकरेंची घेतली भेट

प्रश्नोत्तराचा तास सुरु होण्यापूर्वी पंतप्रधानांनी हे निवेदन केलं. पंतप्रधान म्हणाले, राम हा देशातल्या प्रत्येकाच्या मनात आणि कणाकणात आहे. रामजन्मभुमीवर भगवान रामांचं भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे.

पंतप्रधान पुढे म्हणाले, अयोध्येचा निकाल आल्यानंतर देशाविसायांनी अतिशय प्रगल्भतेचं दर्शन घडवलं होतं. त्यामुळे सगळ्या देशवासियांना मी धन्यवाद देतो. देशातल्या सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाण्याचं माझ्या सरकारचं धोरण आहे. त्यानुसार सरकारची वाटचाल सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

'श्रीरामाच्या मदतीने दिल्लीत भाजपच्या दोन-चार जागा वाढल्या तर आनंदच आहे'

हे आहेत सदस्य

या ट्रस्टमध्ये ज्येष्ठ वकील के. परासरण, जगदगुरु शंकराचार्य, ज्योतिषपीठाधीश्वर स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज (अलाहाबाद), जगदगुरु माधवाचार्य स्वामी विश्व प्रसन्नतीर्थ महाराज (उडुपी पेजावर मठ ), युगपुरुष परमानंद महाराज (हरिद्वार), स्वामी गोविंददेव गिरी महाराज (पुणे) आणि विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र (अयोध्या) यांचा समावेश असेल. हे ट्रस्टी आणखी 5 जणांची नियुक्ती करणार आहेत.

First published: February 6, 2020, 10:26 AM IST

ताज्या बातम्या