Home /News /national /

Modi@8: पंतप्रधानांची जादू आजही कायम तर गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस निष्प्रभ

Modi@8: पंतप्रधानांची जादू आजही कायम तर गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस निष्प्रभ

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची आठ वर्षे (Modi @8) पूर्ण केली असून 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी त्यांचं स्थान भक्कम असून ते इतरांपेक्षा आघाडीवर आहेत.

    मुंबई, 26 मे :  सत्तेची आठ वर्षे हा जनतेचा मूड बदलण्यासाठी मोठा कालावधी आहे. 2012 च्या सुमारास सरकारमधील भ्रष्टाचाराचे घोटाळे पूर्ण ताकदीनिशी समोर आले तेव्हा माजी पंतप्रधान मनमोहनसिंग (Manmohan Singh) यांना याची जाणीव झाली. त्यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीनं (UPA) मागील आठ वर्षांत मिळवलेल्या दोन दमदार विजयाचा लोकांना विसर पडला होता.  नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या राजकीय कौशल्याच्या जोरावर हे आव्हान परतावून लावलं आहे. पंतप्रधानपदाची आठ वर्षे (Modi @8) पूर्ण करूनही 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोदींचं स्थान भक्कम असून ते इतरांपेक्षा आघाडीवर आहेत. मतदारांचा एक भला मोठा गट आजही त्यांच्या बाजूने असल्याचं उत्तर प्रदेश आणि बिहार या मोठ्या राज्यांमधील निवडणुकीत मिळालेल्या विजयातून स्पष्ट झालं. मोदींवर विश्वास महागाईचा (Inflation) प्रश्न, कोव्हिड महामारी(Covid Pandemic), चीनसोबतचा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) सततचा संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धानंतरची बदलती भू-राजकीय परिस्थिती यासारख्या आव्हानात्मक समस्यांवर केवळ मोदींसारखा एक मजबूत आणि मुत्सदी नेताच मार्ग काढू शकतो किंवा त्या सोडवू शकतो, ही गोष्ट जनमानसात रुजत चालली आहे. हे सिद्ध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नेतृत्व काल्पनिक गोष्टींवर आधारित आहे, हे लोकांना पटवून देण्याची मार्ग अवलंबला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलल्यानंतर त्यांनी हे कबूल केलं की, 'गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष हा सध्या सत्ताधारी पक्षासाठी एक हुकूमी एक्का ठरत आहे. या राजकीय खेळाचे नियम त्यांना झोपेतही पाठ आहेत.' काँग्रेस नेत्या म्हणून सोनिया गांधी (Sonia Gandhi) 2004 मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींसारख्या (Atal Bihari Vajpayee) भाजपच्या दिग्गज नेत्यावर मात केली. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी लालकृष्ण अडवाणींचं (LK Advani) स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही.  सध्या सोनिया गांधी स्वत:  किंवा त्यांची मुलं मोदींचा सामना करण्यात अपयशी ठरले आहेत. 2014 पासून देशातील राजकारणात होत असलेले बदल आणि राष्ट्रीय स्तरावर राजकारणातील घराणेशाही नाकारण्यात आल्याने हे शक्य झालं आहे असं मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचं मत आहे. राष्ट्रवादाचा उदय, जातीवर आधारित राजकारणाचा सामना करत असलेल्या व्यापक हिंदुत्त्ववादी मतदारांना केलेलं आवाहन आणि गरीब ग्रामीण मतदारांना लाभ देणाऱ्या योजना हे मोदींच्या विजयाचं सूत्र (Winning Formula) आहे. विरोधी पक्षाकडे भक्कम नेतृत्वाचा अभाव तर आहेच; पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे नरेटिव्हचाही अभाव आहे. गांधी कुटुंबियांच्या नेतृत्वाखालील आघाडी निवडणुकांमध्ये पराभूत होत असताना अनेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी 2014 पासून सर्वपक्षांची मोट बांधून एक विरोधी पक्षांची आघाडी उभारण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यांनी पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून राहुल गांधींचा चेहरा पुढे केल्यामुळे मोदींची सत्ता आणखी बळकट होत गेली. Modi@8 :ईशान्येकडील राज्यांकडे आधी दुर्लक्ष होत असे, आता भारतीय असल्याचा अभिमान वाटतो-बिरेन सिंह मोदी कसे जिंकले? नरेंद्र मोदींच्या 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील विजयासाठी दोन गोष्टी कारणीभूत असल्याचं दिसतं. 2014 मध्ये, यूपीएच्या 10 वर्षांच्या राजवटीच्या झालेले भ्रष्टाचाराचे घोटाळे (Corruption Scams) आणि अण्णा हजारेंच्या लोकपाल (Lokpal) आंदोलनामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीवर लोकांचा विश्वास नाहीसा झाला. मोदींचं राष्ट्रवादी व्यक्तिमत्त्व, राष्ट्रवाद आणि घराणेशाहीला विरोध यामुळे त्यांनी मतदारांचं लक्ष वेधलं. हिंदुत्वाची साथ आणि विकासाच्या आश्वासनाचा दुहेरी डोस कामी आल्यामुळे भाजपने स्वबळावर 282 जागा जिंकल्या आणि उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 पैकी 73 जागांसह विजय मिळवला. 2019मधील मोदींचा विजय आणखी मोठा होता. पण, तो सहजासहजी मिळालेला नक्कीच नव्हता. आपल्या पाच वर्षांच्या सत्तेत मोदींनी मतदारांचा एक नवीन 'लाभार्थी वर्ग' (Beneficiary Class) तयार केला. ज्यात प्रामुख्यानं खेड्यापाड्यांतील गरिबांचा समावेश होता. या वर्गाला सरकारकडून कोणत्याही अडचणींशिवाय गॅस सिलिंडर, शौचालय, बँक खातं किंवा घर अशा स्वरूपात फायदा मिळाला. यामध्ये महिला मतदार मोदींच्या मोठ्या समर्थक होत्या.  2019 मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून मत देण्यासाठी हा वर्ग समोर आलेला दिसतो. निवडणुकीच्या अवघ्या दोन महिन्यांपूर्वी म्हणजे  हल्ल्यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामात दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर  पाकिस्तानमधील बालाकोट एअर स्ट्राइकमुळे (Balakot Strike) राष्ट्रवादाचा जोश शिगेला पोहोचल्यानं मोदींना मोठा विजय मिळाला. राहुल गांधींनी तयार केलेली राफेल घोटाळ्याची (Raphael Scam) हवा निष्प्रभ ठरली.   विरोधकांकडे कोणतंही नवीन नरेटिव्ह राहिलं नाही. त्याचा फायदा घेत भाजपनं 303 जागांवर विजय मिळवला. Modi@8: मोदी सरकारने 2014 पासून राबवलेल्या 8 महत्त्वाकांक्षी योजना मोदी 2.0 ची संमिश्र तीन वर्षे मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात जम्मू-काश्मीरमधील कलम 370 (Section 370) रद्द करणं आणि राज्याचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या मोठ्या धमाकेदार हालचालींनी झाली. येत्या काही महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये शांततापूर्ण विधानसभा निवडणुका घेणं हे केंद्रासाठी मोठं आव्हान असणार आहे. सुप्रीम कोर्टाचा राम मंदिर (The Ram Mandir) प्रकरणातील निकाल हा मोदी सरकारसाठी महत्त्वाचा ठरला आता अयोध्येत अतिशय वेगात राम मंदिराची उभारणी सुरू आहे. 2022 मधील उत्तर प्रदेश निवडणुकीत विजयामध्ये या मंदिरानं मोठी भूमिका बजावली आहे. असं असलं तरी, कृषी सुधारणेसाठी तीन कृषी कायदे (Three Farm Laws) आणणं आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करणं यासारख्या इतर मोठ्या हालचाली मोदींच्या अपेक्षेप्रमाणं पूर्ण झाल्या नाहीत. दिल्लीच्या सीमेवर मुख्यतः पंजाब (Punjab) आणि हरियाणातील (Haryana) शेतकऱ्यांनी वर्षभर चालवलेल्या उत्स्फूर्त आंदोलनानंतर मोदी सरकारला तीन शेतीविषयक कायदे रद्द करावे लागले. शाहीन बाग (Shaheen Bagh) आंदोलनानं जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवली. त्यामुळे संसदेत कायदा तयार करूनही सीएएची अंमलबजावणी करणं अद्याप बाकी आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशानं कोव्हिड महामारीचा सामना करणं, दोन स्वदेशी लसींचं (Indigenous Vaccines) उत्पादन आणि पुढील महिन्यापर्यंत 200 कोटींच्या पार पोहचणारं लसीकरण ही जागतिक स्तरावर कौतुकास पात्र ठरलेली कामगिरी आहे. मोदींच्या निर्णायक नेतृत्वामुळेच देश मोठ्या संकटातून आणि आर्थिकरित्या उद्ध्वस्त होण्यापासून वाचला, अशा गोष्टी भाजपनं जनमानसात रुजवण्यात यश मिळवलं आहे. पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघातील ज्ञानवापी (Gyanvapi) मशीद किंवा अल्पसंख्याकांवरील कथित अत्याचाराच्या घटनांना कायदेशीर लढाई म्हणून सादर केल्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा आणखी मजबूत होत आहे. जागतिक स्तरावरील टीका अधिक तीव्र होत असूनही या गोष्टी 2024 पूर्वी मोदींच्या राजकीय संधींना बळ देतील, अशी अपेक्षा आहे. भारत आता मोदींच्या नेतृत्वाखाली एक मजबूत राष्ट्र आहे ज्याला कोणताही देश नाराज करू इच्छित नाही. शिवाय, भारतातील सुस्त पडलेला विरोधी पक्षही त्याचा प्रतिकार करू शकत नाहीत, असा भाजपाचा दावा आहे.
    First published:

    Tags: BJP, Modi government, PM narendra modi, Rahul gandhi, Sonia gandhi

    पुढील बातम्या