Home /News /national /

Modi@8 :ईशान्येकडील राज्यांकडे आधी दुर्लक्ष होत असे, आता भारतीय असल्याचा अभिमान वाटतो-बिरेन सिंह

Modi@8 :ईशान्येकडील राज्यांकडे आधी दुर्लक्ष होत असे, आता भारतीय असल्याचा अभिमान वाटतो-बिरेन सिंह

ईशान्येकडील राज्यांना केंद्रात मोदी सरकार आल्यामुळे काय फायदे झाले याबद्दल मणिपुरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांनी न्यूज 18 ला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 25 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 26 मे 22 रोजी आठ वर्षं पूर्ण होत आहेत. या निमित्तानं भाजपनं जोरदार सेलिब्रेशनची तयारी सुरु केली आहे. वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमातून केलेल्या कामांची जोरदार प्रसिद्धी करण्याचं भाजपचं नियोजन आहे. ईशान्येकडील राज्यांना केंद्रात मोदी सरकार आल्यामुळे काय फायदे झाले याबद्दल मणिपुरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह ( N Biren Singh) यांनी न्यूज 18 ला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे. तसंच त्यांची वैयक्तिक मतंही व्यक्त केली आहेत. त्यातील काही संपादित अंश: नरेंद्र मोदींबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी वेगळे, विलक्षण असे नेते आहेत. ते अद्वितीय आहेत. भाजप सत्तेवर येण्यापूर्वी मी अन्य नेत्यांबरोबरही काम केलं आहे. पण मोदीजी त्यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. हा फरक खूप मोठा आहे. ते अनेक संकल्पना तयार करतात आणि आमच्यासोबत त्या शेअरही करतात. फक्त राजकीय स्वार्थासाठी ते काम करत नाहीत. मोदीजी नेहमीच सर्वसामान्य माणसासाठी आणि जनतेसाठी विचार करतात. 2014 नंतर पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांकडे जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलं असं तुम्हाला वाटतं का? खूप चांगला प्रश्न आहे. ईशान्येकडील राज्यांमधील एक नागरिक या नात्याने मला आधी काय वाटतं होतं आणि आता माझ्या काय भावना आहेत हे व्यक्त करायला मला नक्कीच आवडेल. मोदीजी सत्तेवर येण्यापूर्वी भारतातील मुख्य राज्यांतील नागरिकांकडून आम्हाला नेहमीच हीन वागगणूक दिली जायची.  आम्ही काही सांगण्यासाठी केंद्राकडे जायचो, तेव्हा तिथं आम्हाला काही बोलण्याची संधीच दिली जायची नाही. आता आम्हाला आमचं मत व्यक्त करता येतं. उदाहरणार्थ आम्हाला एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि त्याची मागणी करण्यासाठी मी दिल्लीला गेलो, तर तिथे प्रत्येकजण आम्हाला मदत करायला सज्ज असतो.  आमचं सरकार 2017 साली सत्तेत आल्यानंतर  मी लगेच दिल्लीला गेलो होतो. पंतप्रधानांनी ‘घर घर जल’ या योजनेची घोषणा केली होती. त्यावेळेस, मी सुमारे 3,500 कोटी रुपयांचा एक प्रस्ताव सादर केला होता. मणिपूरसारख्या राज्यासाठी 3,500 कोटी ही खूप मोठी रक्कम आहे. ती आम्हाला दिली जाईल याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. पण पंतप्रधानांची भेट झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वरिष्ठ सेक्रेटरीला याबद्दल सूचना केली आणि एका आठवड्याच्या आत आम्हाला ती रक्कम मिळाली. इतकंच नाही तर सात महिन्यांच्या आत तो प्रकल्पही सुरु झाला. भारतीय लष्करातचं झळझळीत यश! सूर्यकिरणांनी चमकणाऱ्या या पर्वतावर चढाई प्रथमच केली चढाई, पाहा PHOTOS म्हणजेच ईशान्येकडे जास्त भर दिला जात आहे? आता आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. याआधी आम्हाला कधीही चांगली वागणूक दिली जात नव्हती. यापूर्वी केंद्रातल्या मंत्र्यांचे हावभाव, वागणूक यावरूनच ते आम्हाला तुच्छ लेखतात हे समजत असे. आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. मोदीजी ईशान्येकडील राज्यांनाही त्यांच्या कुटुंबातील सदस्यच मानतात. गेल्या सात ते आठ वर्षांत मोदीजींनी ईशान्येकडील राज्यांना 50 पेक्षा जास्त वेळा भेट दिली आहे. पंतप्रधानच इतक्या वेळा भेट देत आहेत म्हटल्यावर त्यांचे केंद्रीय मंत्रीही आलटून पालटून आमच्याकडे भेटी देतात आणि आम्हाला कशाची गरज आहे का, त्याची विचारणा करतात. त्यामुळे आम्हालाही आता आपण एका कुटुंबातील असल्यासारखंच वाटतं. पंतप्रधान मोदींबद्दलचा तुमच्या लक्षात राहिलेला एखादा इंटरेस्टिंग किस्सा सांगाल का? मोदीजी ईशान्येकडील राज्यांमधील लोकांची खूप काळजी घेतात. मणिपूरच्या संस्कृतीचं संवर्धन होईल याची काळजी घेतात. तुम्हाला लेरम फी (पारंपरिक मणिपूरी टॉवेल) माहिती आहे का? मी जेव्हा दिल्लीला गेलो आणि त्यांना लेरम फी भेट दिला होता. ‘ ही आमच्या भागातील खूप लोकप्रिय वस्तू आहे,’असं मी त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं. त्यानंतर जेव्हा त्यांनी गंगास्नान केलं तेव्हा लेरम फी त्यांच्या खांद्यावर असल्याचं आम्ही पाहिलं. आपल्याला लेरम फीबद्दल माहिती आहे आणि भारतातील अभिमानास्पद परंपरेपैकी ती एक असल्याचंही ते म्हणाले. ते आपल्याला खूप आवडल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. ते ऐकून मला खूप छान वाटलं होतं. मणिपूरच्या खेळाडूंचे ते ज्या पद्धतीने कौतुक करतात ते बघून खूप आनंद होतो. ते दूरदृष्टी असलेले नेते आहेत, सगळ्यांपेक्षा खूप वेगळे आहेत. Modi@8: मोदी सरकारने 2014 पासून राबवलेल्या 8 महत्त्वाकांक्षी योजना एखाद्या संकटकालीन परिस्थितीत एक ज्येष्ठ सहकारी म्हणून ते कसे आहेत? मणिपूर हे आकाराने पण खूप गुंतागुंतीचं राज्य आहे. मी जेव्हा त्यांच्याकडे एखादी समस्या घेऊन जातो, तेव्हा ते माझं पूर्ण ऐकून घेतात आणि मग आम्हाला मार्गदर्शन करतात. ते आम्हाला नेहमी उपलब्ध असतात,  मार्ग दाखवतात. एकदा आमच्याकडे संकटकालीन परिस्थिती होती. मी त्याबद्दल त्यांच्याशी बोललो. ‘बिरेन, तुमची मागणी रास्त आहे,’ असं त्यांनी मला सांगितलं. मला त्यांनी अमित शाहजी यांच्याशी बोलायला सांगितलं. त्यांनी मला विचारलं, ‘तुम्ही अमितभाईंना भेटलात का? त्यांना भेटा. ते याबद्दल प्रतिक्रिया देतील आणि त्यांना याबद्दल पूर्ण माहिती आहे,’मग मी अमितजींकडे गेलो. हे सगळं एखाद्या कुटुंबासारखंच आहे. तुम्ही मोदी सरकारला किती मार्क द्याल? शंभर टक्क्यांपेक्षाही जास्त. तुम्हाला ईशान्येकडील राज्य आणि संपूर्ण देशातच अनेक बदल झालेले दिसतील. मणिपूर कसं बदलत आहे ते पाहा, AFSPA चे अधिकारक्षेत्र आता कमी करण्यात आले आहे, आता फक्त तिथे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठं आहेत. मणिपूरमधील हुतात्म्यांचा अंदमानमध्ये गौरव करण्यात आला आहे. मणिपुरी लोकांच्या भावनांना मोदीजींना हात घातला आहे. त्यांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळायला हवेत. याआधी आम्हाला लाज वाटत असे, पण आता मोदीजींमुळे आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात पुढे, जगभरातील दिग्गज नेते पाठीमागे, एक फोटो ज्याने देशाचं लक्ष वेधलं तुम्हाला पंतप्रधान मोदींना काय सांगायचे आहे? पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मला अभिनंदन आणि कौतुक करायचं आहे. मोदीजी 15 वर्षांपेक्षाही जास्त काळ सत्तेवर राहावेत अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्यांच्यासारखे नेते मिळणं ही खूप दुर्मिळ आणि भाग्याची गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नेतृत्व करू शकेल असे ते एकमेव नेते आहेत. मोदीजी सत्तेवर कायम राहिले तर आपलं राष्ट्र एक दिवस जगात सर्वांत जास्त प्रगती करेल यात शंका नाही.
    First published:

    पुढील बातम्या