Home /News /national /

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जनतेला पत्र, वर्षपूर्तीनिमित्तानं साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जनतेला पत्र, वर्षपूर्तीनिमित्तानं साधला संवाद

मोदी सरकारनं वर्षभरात शेतकऱ्यांपासून करदात्यांपर्यंत आणि यासोबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

    नवी दिल्ली, 30 मे : मोदी सरकारला सत्तेत आल्यानंतर आज वर्षपूर्ती झाली. त्यानिमित्तानं खास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (pm modi) जनतेसोबत पत्राद्वारे संवाद साधला आहे. 30 मे 2019 ला मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आलं. त्यानंतर वर्षभरात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कलम 370 रद्द करणे, राम मंदिरचा प्रश्न, तिहेरी तलाक रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा यासारखे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. वर्षभरात सरकारनं केलेल्या कामाचा आढावा पंतप्रधान मोदींनी या पत्रामध्ये घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात असं म्हटलं आहे की, 2019 मध्ये आपल्या आणि जनतेचे आशीर्वाद वर्षभरात घेतलेल्या मोठ्या निर्णयांसाठी होते. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या मंत्राने देश सामाजिक, आर्थिक, जागतिक किंवा अंतर्गत प्रत्येक दिशेने पुढे जात आहे. या ऐतिहासिक निर्णयांच्या दरम्यानही असे अनेक निर्णय आणि बदल झाले आहेत ज्यांनी भारताच्या विकासाला नवीन वेग आणि नवीन उद्दीष्टे मिळाली आहेत. लोकांच्या अपेक्षाही पूर्ण झाल्या. गरीब, शेतकरी, महिला आणि तरुणांचा उल्लेख करताना मोदी लिहितात, प्रत्येक शेतकऱ्याला पंतप्रधान पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेता येणार आहे. वर्षभरात साडेनऊ कोटी नशेतकऱ्यांच्या खात्यात 72 हजार कोटींची रक्कम जमा कऱण्यात आली आहे. हे वाचा-कोरोनानंतरचा धक्का सावरण्यासाठी मोदींचा Action Plan, असं असेल शैक्षणिक धोरण! याशिवाय एक देश एक कर योजना, शेतकरी आणि महिलांसाठी विविध योजनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबवल्या. या वर्षात आलेलं कोरोनाचं संकट. देशातील विकासाचा वेग वाढत असतानाचा कोरोनानं भारताला विळखा घातला. लॉकडाऊनपासून ते आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या वॉरियर्सला मदत करण्यापर्यंत जनतेनं चांगली साथ दिल्यामुळे आज जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. भारतातील संख्या सर्वाधिक आहे त्यामुळे कोरोनाचा उद्रेक झाल्यास जगात धोका निर्माण होईल ही जगभरात भीती व्यक्त केली जात असताना भारत विकसनशील देश असूनही काय करू शकतो हे आपण दाखवून दिलं. या लॉकडाऊनच्या काळात छोटे उद्योगधंदे, व्यवसाय आणि अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर काही बंद पडले. अनेक मजूर बेरोजगार झाले. त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरीनं प्रयत्न करीत आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. हे वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय, PMOमध्ये केले असे फेरबदल हे वाचा-लॉकडाऊनमध्ये जास्त सूट दिल्यास वैज्ञानिकांनी व्यक्त केली भीती संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Amit Shah, BJP, Coronavirus, Coronavirus symptoms, PM narendra modi

    पुढील बातम्या