नवी दिल्ली 29 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय स्तरावर आज प्रशासनात मोठे बदल केले आहेत. देशात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर आहे. आर्थिक स्तरावर प्रचंड घसरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या बदलांना महत्त्व प्राप्त झालं आहे. सर्व प्रशासनावर नियंत्रण असलेल्या PMOमध्ये म्हणजेच पंतप्रधान कार्यालयातही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. कुटूंब कल्याण विभागातले सचिव अरुण सिंघल यांना ग्राहक संरक्षण आणि मानक प्रधिकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. IAS अधिकारी श्रीधर सिंघल यांची पंतप्रधान कार्यालयात संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरे IAS अधिकारी एस. गोपालकृष्णन यांची पंतप्रधान कार्यालयात सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कॅबिनेट सचिवालयात संचालक असलेल्या मीरा मोहंती यांची पंतप्रधान कार्यालयात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आणखी एक IAS अधिकारी राजेंद्र कुमार यांची इलेक्ट्रॉनिक आणि माहिती विभागात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे PMOच्या माध्यमातून प्रशासनावर अत्यंत मजबूत पकड ठेवतात असं म्हटलं जातं. सर्व मंत्रालयात समन्वय साधणं. महत्त्वाच्या निर्णयांबाबत पंतप्रधानांना सल्ला देणं. पंतप्रधानांच्या सूचना सर्व मंत्रालयांना कळवणं, योजनांची अंमलबजावणी नियोजित वेळेप्रमाणं होते किंवा नाही यावर देखरेख ठेवणं अशी अत्यंत महत्त्वाची कामं PMOच्या माध्यमातून केले जातात. त्यामुळे या बदलांना महत्त्वा प्राप्त झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







