Home /News /national /

लॉकडाउन कधी संपणार? पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत दिले संकेत

लॉकडाउन कधी संपणार? पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत दिले संकेत

लॉकडाउनचा काळ 21 दिवसांनी संपणार की लॉकडाउन वाढवणार याविषयी अद्याप कुठलाही अधिकृत निर्णय दिलेला नाही. पण...

    नवी दिल्ली, 2 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला देशाला दिलेल्या संदेशात Coronavirus चा संसर्ग रोखण्यासाठी 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली होती. पण या  Lockdown नंतरही देशात कोरोनाव्हायरलचं संक्रमण वेगाने होत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या आणि कोरोनाबळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता हा लॉकडाउन नेमका 14 एप्रिलला संपणार का याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदी किंवा आरोग्य मंत्रालयातील अधिकारी यांनी लॉकडाउनचा काळ 21 दिवसांनी संपणार की लॉकडाउन वाढवणार याविषयी अद्याप कुठलाही अधिकृत निर्णय दिलेला नाही. पण पंतप्रधानांनी 14 एप्रिलला ही टाळेबंदी मोकळी होईल, असे संकेत दिले. वाचा - '15 एप्रिलला लॉकडाऊन संपणार पण...' CM ने केलेलं ट्वीट पुन्हा केलं डिलीट कोरोनाव्हारसच्या संकटाचा सामना करण्याविषयी पंतप्रधानांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. कोरोना संकटकाळात पंतप्रधानांनी घेतलेली ही मुख्यमंत्र्यांची दुसरी बैठक ठरली. राज्याराज्यात पसरत चाललेल्या या विषाणूच्या संसर्गाल रोखण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येईल या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. लॉकडाउननंतर काय? लॉकडाउननंतरची परिस्थिती कशी हाताळायची, लॉकडाउन संपल्यानंतर लोक बाहेर पडायला सुरुवात करतील त्याचं नियोजनक करण्याविषयी बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाल्याचं समजतं. लॉकडाउन संपल्यानंतर एकदम गर्दी न होता हळूहळू समाजजीवन कसं रस्त्यावर येईल याविषयी मुख्यमंत्र्यांचा सल्ला मोदींनी विचारला. लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठीचा प्लॅन प्रत्येक मुख्यमंत्र्याने पंतप्रधानांना द्यायचा आहे. या लॉकडाउन एक्झिट स्ट्रॅटेजीवर यापुढच्या काळात चर्चा होईल. 14 तारखेला लॉकडाउन संपल्यावर परिस्थिती कशी हाताळणार हे राज्यांनी केंद्राला कळवायचं आहे. यापुढचे काही आठवडे कोरोनाव्हायरसा संसर्ग पसरण्यापासून रोखणं हे आव्हान असेल. त्यासाठी कोरोनाग्रस्त संशयितांचा शोध, त्यांची चाचणी, आयसोलेशन आणि क्वारंटाइन हे मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत, असं मोदींनी सांगितलं. यापूर्वी 20 मार्चला पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर 24 तारखेला देशव्यापी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. देशभरात कोरोनाबळींची संख्या 50 च्या जवळ पोहोचली आहे. आतापर्यंत 1965 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. लॉकडाऊनमध्येही लेकाने पूर्ण केली आईची शेवटची इच्छा, डोळ्यांत अश्रू आणणारा क्षण
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या