Home /News /news /

लॉकडाऊनमध्येही लेकाने पूर्ण केली आईची शेवटची इच्छा, डोळ्यांत अश्रू आणणारा क्षण

लॉकडाऊनमध्येही लेकाने पूर्ण केली आईची शेवटची इच्छा, डोळ्यांत अश्रू आणणारा क्षण

दोन मुलं आणि एक मुलगी असे अपत्य असलेल्या आईची प्रकृती खराब झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. अशात लॉकडाऊन असल्यामुळे आईची शेवटची इच्छा पूर्ण करणं शक्य नव्हतं.

    चंद्रपूर, 02 एप्रिल : आई आणि मुलाचं नात सगळ्यात पवित्र असतं. या नात्याचं एक अनोखं उदाहरण समोर आलं आहे. दोन मुलं आणि एक मुलगी असे अपत्य असलेल्या आईची प्रकृती खराब झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. अशात लॉकडाऊन असल्यामुळे आईची शेवटची इच्छा पूर्ण करणं शक्य नव्हतं. पण यावर नाराज होत मुलाने माघार नाही घेतली तर खूप प्रयत्न केले आणि अखेर आईची शेवटची इच्छा पूर्ण केली. मुलाच्या या प्रयत्नाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. विमल व्यंकटी कटकमवार या चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा इथल्या रहिवासी होत्या. संपूर्ण आयुष्य एकाच गावात गेल्यामुळे मातीशी नाळ जुळली होती. दोन मुलं आणि एक मुलगी झाली. मुलांची लग्न झाली. सगळं कसं सुरळीच चालू होतं. पण व्यवसायामुळे दोन्ही मुलांना वेगळं रहावं लागलं. एक मुलगा चंद्रपूर तर दुसरा मुलगा चुनाळा इथे राहत होता. सगळं आयुष्य सुखात जात असताना वाढत्या वयामुळे आजारपण मागे लागलं. यावर एकटं राहण्याऐवजी प्रमोद कटकमवार या लहान मुलासोबत चुनाळामध्ये राहण्याचा निर्णय विमल यांनी घेतला. त्या अनेक वर्ष तिथे राहिल्या. पण नंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आई लवकरच बरी होईल या आशेवर मुलगा होता. आजार थोडा गंभीर असल्यामुळे विमल यांना चंद्रपूर इथल्या रुग्णालयात हलवण्यात आलं. पण तरीही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर डॉक्टरांनी विमल यांना नागपूरच्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. लॉकडाऊनचा कसलाही विचार न करता प्रमोदने रुग्णवाहिकेतून आईला नागपूरला नेण्याची तयारी केली. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. रुग्णवाहिकेतून जात असतानाच विमल यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या जाण्यामुळे प्रमोदवर दुखाचा डोंगर कोसळला होता. आईच्या जाण्याची दुखद बातमी त्याने कुटुंबियांना सांगितली. नंतर आईचे अंत्यसंस्कार कुठे करायचे असा प्रश्न उपस्थित झाला. कारण चुनाळा इथे राहत असल्यामुळे तिकडे सगळ्यांची नात जुळलं होतं. त्यात मुळ गावी धाबा इथे कोणीही नातेवाईक नव्हतं. पण तरीदेखील प्रमोदने आईची शेवटची इच्छा पूर्ण केली. विमल या जिवंत असताना त्यांनी माझे अंत्यसंस्कार हे धाबा इथे व्हावे अशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे अगदी जवळचे नातेवाईक, भावंड, मुलं आणि मुलगी यांच्या उपस्थितीत विमल यांचा अंत्यसंस्कार पार पडला. या सगळ्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. त्यामुळे आईवरचं हे प्रेम पाहून सगळ्यांच्या कडा पाणावल्या.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या