काय आहे प्रकरण? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुधवारी पंजाब दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात फिरोजपूरमध्ये पंतप्रधानांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सुरक्षेत कसूर झाल्याचं लक्षात आल्यामुळे ते फिरोजपूरला जाऊ शकले नाहीत. याच दरम्यान पंतप्रधान जात असलेल्या मार्गावर काही आदोलकांनी अचानक गर्दी केल्यामुळे त्यांचा ताफा एकाच जागी थांबून राहिला. जवळपास 15 ते 20 मिनिटं हा ताफा एकाच जागी थांबून राहिला. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला. या कारणामुळे त्यांचा पूर्ण दौराच रद्द करून पंतप्रधानांना दिल्लीला परत जाण्याची विनंती करण्यात आली. पंतप्रधानांनी दिला निरोप पंतप्रधान मोदी हा दौरा रद्द करून दिल्लीला परत येण्यासाठी भटिंडा विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी बातचित केली. यावेळी आपण विमानतळावर सुरक्षित पोहोचू शकलो, याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद द्या, असा उपरोधिक टोला पंतप्रधानांनी लगावल्याची माहिती विमानतळ कर्मचाऱ्यांनी दिली आहे. हे वाचा- काय सांगता! 'या' विद्यापीठात दिलं जातंय Party करण्याचं शिक्षण, प्रवेशासाठी झुंबड केंद्र विरुद्ध राज्य सरकार पंतप्रधानांच्या सुरक्षेत कसूर झाल्याच्या मुद्द्यावरून आता केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा वाद उभा राहण्याची चिन्हं दिसू लागली आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची तयारी केंद्रीय गृह खात्यानं केली आहे. पंजाबची विधानसभा निवडणूक आणि त्याला असणारी शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी या दोन्ही बाबींचा विचार करता या घटनेचे मोठे पडसाद नजीकच्या भविष्यात उमटण्याची चिन्हं आहेत.Officials at Bhatinda Airport tell ANI that PM Modi on his return to Bhatinda airport told officials there,“Apne CM ko thanks kehna, ki mein Bhatinda airport tak zinda laut paaya.” pic.twitter.com/GLBAhBhgL6
— ANI (@ANI) January 5, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.