जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / काय सांगता! 'या' विद्यापीठात दिलं जातंय चक्क Party करण्याचं शिक्षण, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी झुंबड

काय सांगता! 'या' विद्यापीठात दिलं जातंय चक्क Party करण्याचं शिक्षण, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी झुंबड

सांकेतिक फोटो

सांकेतिक फोटो

तिथे तुम्हाला खानपान आणि लाइफस्टाइलसंदर्भात शिकवण्यात येईल. या कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 05 जानेवारी:  एखाद्या विषयात पदवी घ्यायची किंवा एखादा कोर्स करायचा म्हटलं, की अभ्यास, परीक्षा या गोष्टी येतात. मजा-मस्ती करता येत नाही. त्यामुळे अनेकांना शिक्षण घेणं नकोसं वाटतं; पण शिक्षण घेताना, तुम्हाला पार्टी करायला मिळेल किंवा पार्टी करणं हाच तुमच्या शिक्षणाचा भाग असेल, असं म्हटलं, तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना! पण हे खरं आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, एका विद्यापीठात (University Offering Degree for Party) खानपान आणि लाइफस्टाइलवर शिक्षण देण्यात येत आहे. ‘न्यूयॉर्क पोस्ट’नुसार, फ्रान्समधल्या (Weird Degree Course) सायन्स पो लिले (Sciences Po Lille) या प्रतिष्ठित विद्यापीठात असा एक कोर्स सुरू करण्यात आला आहे. तिथे तुम्हाला खानपान आणि लाइफस्टाइलसंदर्भात शिकवण्यात येईल. या कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. बीएमव्ही (BMV) असं या कोर्सचं नाव आहे. बोयर, मँगर विवर (Boire, Manger, Vivre) म्हणजे अन्न, पेयं आणि जीवनशैली होय. याच्याशी संबंधित विस्तृत विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत. तसंच गॅस्ट्रो-डिप्लोमसी, फूड टेक आणि किचनशी संबंधित सर्व गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना वनस्पती, शेती, मांस यासारख्या विषयांचं ज्ञान देण्यात येईल. तसंच त्यांना खाद्यपदार्थांवरच्या विविध परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करताय? मग असे कमवा भरघोस पैसे ‘न्यूयॉर्क पोस्ट’नुसार, या कोर्ससंदर्भात विविध घोषणा करण्यात आल्या होत्या. यातल्या अनेक गोष्टी लोकांना मजेशीर वाटल्या. 15 जागांसाठी एकूण 70 जणांनी अर्ज केले होते. साहजिकच फक्त 15 जणांची निवड करण्यात आल्याचं लेक्चरर बेनिट लेंगाइग्ने यांनी सांगितलं. जगातला सर्वाधिक पसंती असलेला पर्यटन देश म्हणजे फ्रान्सला जपण्यासाठी हा कोर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असं अॅकॅडमीच्या संचालकांनी म्हटलं आहे. विशेष अशा या कोर्समध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. Le Monde च्या वृत्तानुसार विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे, की हा कोर्स खूप आकर्षक असून आम्ही कोणताही विचार न करता प्रवेश घेतला. गॅस्ट्रोनॉमी, फूड वर्ल्ड आणि क्लायमेट चेंजच्या दृष्टीनेदेखील हा कोर्स महत्त्वपूर्ण असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. तसंच नोकरी मिळेल की नाही, याची काळजी वाटत होती; मात्र ज्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार चांगली नोकरी मिळेल याची खात्री पटल्याचं ते म्हणाले. तुम्हालाही पार्टी आणि लाइफस्टाइल हे विषय आवडत असतील, तर तुम्हीही अशा प्रकारच्या कोर्सला प्रवेश घेऊन या संदर्भात शिक्षण घेऊ शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात