जाहिरात
मराठी बातम्या / देश / Pm modi LIVE : घोटाळेबाजांकडून केंद्राच्या ED, CBI वर दबाव; मोदींचा शिवसेना, राष्ट्रवादीला फटकारलं

Pm modi LIVE : घोटाळेबाजांकडून केंद्राच्या ED, CBI वर दबाव; मोदींचा शिवसेना, राष्ट्रवादीला फटकारलं

Pm modi LIVE : घोटाळेबाजांकडून केंद्राच्या ED, CBI वर दबाव; मोदींचा शिवसेना, राष्ट्रवादीला फटकारलं

घोटाळा करून बसलेली लोक आता तपास सुरू झाल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेवर दबाव आणत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली,  10 मार्च :  ‘घोटाळा (scam) करून बसलेली लोक आता तपास सुरू झाल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेवर दबाव आणत आहे. त्यांचा देशाच्या तपास यंत्रणेवर विश्वास नाही’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी महाविकास आघाडी सरकारमधील (mva government) घोटाळेबाज नेत्यांवर निशाणा साधला. (pm narendra modi vijay sabha speech) पाच राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपच्या मुख्यालयात विजय सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी महाराष्ट्रात सुरू असलेल्या ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवरून पंतप्रधानांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप केला. ‘भ्रष्टाचार मोठी समस्या आहे. घोटाळा करून बसलेली लोक आता तपास सुरू झाल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेवर दबाव आणत आहे. त्यांचा देशाच्या तपास यंत्रणेवर विश्वास नाही. आधी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला आणि आता तपास सुद्धा होऊ देत नाही. तपासापासून लक्ष दूर करण्यासाठी जातीपातीचे राजकारण करत आहे, असं मोदी म्हणाले. ‘आणखी एक विषय आहे. हा विषय भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई रोखण्याचं षडयंत्र. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवा की नको? आपल्या देशात भ्रष्टाचाराच्या विरोधात, भ्रष्टाचारींच्या प्रती द्वेष आहे. देशाच्या कमाईला लुटून आपली तिजोरी भरण्याची प्रवृत्ती काही लोकांची ओळख बनली आहे’ अशी टीका मोदींनी केली. तसंच, ‘भाजप २०१४ मध्ये एक प्रामाणिक सरकारचं वचन देत निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2019 ला नागरिकांनी पुन्हा विश्वास दाखवला. मोदी सरकारचं भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई करु शकतं, असा नागरिकांचा विश्वास आहे. पण आज निष्पक्ष संस्था भ्रष्टाचाराविरोधात कारवाई कतात तेव्हा हे लोक त्या संस्थांना बदनाम करण्यासाठी पुढे येतात. ते आपल्या इको सिस्टिमच्या मदतीने केंद्रीय यंत्रणांवर दबाव निर्मिती करत आहेत. तपास यंत्रणांना रोखण्यासाठी हे लोक आपल्या इको सिस्टिमसोबत मिळून नवनवे मार्ग शोधतात. या लोकांना देशाच्या न्यायपालिकेवरही विश्वास नाही. आधी हजारो कोटींची भ्रष्टाचारा करायचा, त्यानंतर तपासही करु द्यायचा नाही, तपास सुरु झाला तर यंत्रणांवर आपल्या इको सिस्टिमच्या मदतीन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. ही या लोकांची प्रवृत्ती आहे. हे लोक कोणत्याही भ्रष्टाचाऱ्यावर कारवाई होताच धर्म, जाती, प्रदेशचा रंग देतात. कोणत्या माफियाविरोधात कोर्ट काही निकाल सुनावते तर त्याचाही संबंध हे लोकं जातपातीशी जोडतात. मी सर्व सांप्रदायांना विनंती करतो की अशा प्रवृत्तींनी समाज आणि संप्रदायापासून दूर करा’ असंही मोदी म्हणाले. ‘2019 च्या निवडणुकीनंतर काही राजकीय ज्ञानींनी सांगितलं होतं की, या जीतमध्ये काय आहे? ते 2017 मध्ये निश्चित झालं होतं कारण युपीत भाजप जिंकली होती. त्यामुळे या निवडणुकीने 2014 चे मते निश्चित केले आहेत’ असंही मोदी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात