मराठी बातम्या /बातम्या /देश /पंतप्रधान मोदींनी सांगितली नव्या FDI ची व्याख्या, म्हणाले, 'देशासाठी आहे धोकादायक'!

पंतप्रधान मोदींनी सांगितली नव्या FDI ची व्याख्या, म्हणाले, 'देशासाठी आहे धोकादायक'!

'कुठेही आंदोलन सुरू झाल्यास तिथे एक नवी जमात आली आहे, आंदोलनजीवी ही जमात देशात कुठेही पोहोचत आहे. या आंदोलनजीवीपासून देशाने सावध राहिले पाहिजे'

'कुठेही आंदोलन सुरू झाल्यास तिथे एक नवी जमात आली आहे, आंदोलनजीवी ही जमात देशात कुठेही पोहोचत आहे. या आंदोलनजीवीपासून देशाने सावध राहिले पाहिजे'

'कुठेही आंदोलन सुरू झाल्यास तिथे एक नवी जमात आली आहे, आंदोलनजीवी ही जमात देशात कुठेही पोहोचत आहे. या आंदोलनजीवीपासून देशाने सावध राहिले पाहिजे'

नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी राज्यसभेत (rajya sabha) आज जोरदार भाषण केले. सरकारी योजनांपासून ते शेतकरी आंदोलकांपर्यंत सर्वच मुद्यावर त्यांनी रोखठोक मत मांडत विरोधकांनाही टोले लगावले. यावेळी परदेशी गुंतवणूक अर्थात एफडीआयबद्दल (FDI) नवीन व्याख्यात मोदींनी सांगितली.

शेतकरी आंदोलनाला परदेशातील दिग्गज, सामजिक कार्यकर्ते आणि सेलिब्रिटींनी पाठिंबा दर्शवला आहे. याच मुद्यावर पंतप्रधान मोदींनी कुणाचाही उल्लेख न करत 'एफडीआय' असं म्हणत टीकास्त्र सोडले आहे.

'देशात आता एक नवीन एफडीआय आला आहे, एफडीआय मुळात ही परदेशी गुंतवणूक असते पण ही एफडीआय फॉरेन डिस्ट्रक्विव आयडॉलॉजी (foreign destructive ideology) अशी आहे.  हिंदीमध्ये याचा अर्थ काढला विदेशी विनाशकारी विचारधारा असा आहे, त्यामुळे देशाने यांच्यापासून सावध राहिले पाहिजे', असं मोदी म्हणाले.

आधी पाठिंबा दिला मग यू-टर्न का? कृषी कायद्यावरुन पंतप्रधान मोदींचा पवारांना सवाल

मागील काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी  परदेशीतील सेलिब्रिटी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केली आहे.पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेची पॉप स्टार रिहाना आणि पोर्न एक्ट्रेस राहिलेल्या मिया खलीफाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ट्वीट केले होते. त्याविरोधात अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी, सचिन तेंडुलकर यांनी ट्वीट करून हा आमच्या देशातला अंतर्गत मुद्दा आहे, त्यावर भाष्य करू नका, असं परखड  शब्दांत सुनावले होते. पंतप्रधान मोदींनी आता या सेलिब्रिटींनी उत्तर देत 'एफडीआय' असे नामकरण केले आहे.

'मोदी है मौका लिजिए', पंतप्रधान मोदींचा विरोधकांना सणसणीत टोला

तसंच, 'गेल्या काही दिवसांपासून देशात कुठेही आंदोलन सुरू झाल्यास तिथे एक नवी जमात आली आहे, आंदोलनजीवी ही जमात देशात कुठेही पोहोचत आहे. या आंदोलनजीवीपासून देशाने सावध राहिले पाहिजे, आंदोलनजीवी हे सगळ परजीवी असतात, ज्यांचं सरकार आहे त्यांना या आंदोलनजीवींचा चांगलाच अनुभव असतो', असंही मोदी म्हणाले.

First published:

Tags: Bollywood, Farmer protest, Narendra modi, Pm in rajyasabha, Pm modi speech