Home /News /national /

त्या बिकट क्षणी मुलाने पुढे येत वाचवला आईचा जीव, आपल्या जन्मदात्रीला दिलं हे खास 'Gift'

त्या बिकट क्षणी मुलाने पुढे येत वाचवला आईचा जीव, आपल्या जन्मदात्रीला दिलं हे खास 'Gift'

दिल्लीत एका मुलाने मातृदिनानिमित्त आईला अनमोल भेट दिली आहे. 25 वर्षीय अभिनव मुखर्जी यांनी किडनी दान करून आईचे प्राण वाचवले. अभिनव म्हणाला की, त्याला फक्त त्याच्या आईचा जीव कुठल्याही परिस्थितीत वाचवायचा होता.

    नवी दिल्ली, 14 मे : आई मुलाला जीवन देते, हे सत्य जगात सर्वांना माहीत आहे. मात्र, एका घटनेत मुलाने आईचा जीव वाचवत तिला जीवनदान दिलं आहे. 25 वर्षीय मुलाने आईचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला. किडनी निकामी झाल्यामुळे आईची प्रकृती खूपच गंभीर झाली होती. तिला दैनंदिन कामही करता येत नव्हते. किडनी प्रत्यारोपण हा एकमेव उपचार होता. अशा परिस्थितीत मुलाने किडनी दान (Kidney donation) करून आईचे प्राण वाचवले (son saved mothers life). आईसाठी यापेक्षा चांगली भेट कोणती असू शकते, ज्या मुलाला तिने जन्म दिला, त्या मुलाने तिचे प्राण वाचवले. पिया मुखर्जी या 45 वर्षीय महिलेवर दिल्लीतल्या आकाश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. युरोलॉजी विभागाचे एचओडी डॉ विकास अग्रवाल यांनी सांगितलं की, महिलेला काही दिवसांपासून पायात दुखत होते. त्या थकल्या होत्या आणि वजन कमी होत होतं. औषधानेही काम केले पण त्याचा त्रास काही कमी झाला नाही. तपासणीअंती महिलेची किडनी निकामी झाली असून ती अंतिम टप्प्यात असल्याचे आढळून आले. आईची ही अवस्था पाहून फक्त मुलगाच किडनी दानासाठी पुढे आला. डॉक्टरांनी सांगितलं की, या प्रकरणात आईने अविवाहित मुलाकडून किडनी घेणं ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. हे वाचा - LeT च्या दहशतवाद्याला अटक; सुरक्षा दल, VIP वर हल्ला करण्याचा आखत होता कट मुलाकडून किडनी मिळाल्यानंतर आईने सांगितलं की, मी व्यवसायाने नृत्यांगना असून किडनी निकामी झाल्यामुळे पुन्हा नृत्याचे दिवस येण्याच्या आशाच मावळली होती. आई असल्यामुळे माझ्या मुलाकडून किडनी मिळवणं हा माझ्यासाठी सोपा निर्णय नव्हता, पण किडनी दान करण्याबाबत तो अगदी ठाम होता. त्याने इतर सर्वांचं म्हणणं डावलून मला कि़डनी देण्याचा निर्णय़ घेतला. कारण त्याला माझा जीव वाचवायचा होता, माझा जीव वाचवणे ही त्याची प्राथमिकता होती. मुलगा अभिनव मुखर्जी म्हणाला की, माझ्यासाठी माझ्या आईचा जीव वाचवण्यापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही. हे वाचा - तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून पोलिसांपासून बचावासाठी बनला साधू, अशी झाली पोलखोल देशात लाइव्ह डोनेशनमध्ये (जिवंतपणी अवयवदान) मुली किंवा महिला नेहमीच पुढे असतात. सुमारे 75% दाते महिला आहेत. आई-वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी फार कमी तरुण मुलं अवयव दान करण्यासाठी पुढे येतात.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Love, Mother

    पुढील बातम्या