Home /News /national /

50 वर्ष सोबत जगले आणि जगाचा निरोपही सोबतच घेतला; पत्नीच्या निधनानंतर 10 मिनिटातच पतीचाही मृत्यू

50 वर्ष सोबत जगले आणि जगाचा निरोपही सोबतच घेतला; पत्नीच्या निधनानंतर 10 मिनिटातच पतीचाही मृत्यू

पत्नीने निधनाच्या आधी पाणी पिण्यासाठी मागवलं होतं. पती पाणी घेऊन पत्नीकडे गेला, मात्र तिने पाणी पिलं नाही. पत्नीचा मृत्यू झाला होता.

    जयपूर 15 मे : शुक्रवारी राजस्थानमधील बांसवाडा येथे पत्नीच्या मृत्यूनंतर काही मिनिटांतच पतीचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. लग्नानंतर 50 वर्षे एकत्र आयुष्याचा प्रवास केल्यानंतर दोघांनी काही मिनिटांच्या अंतरातच जगाचा निरोप घेतला. दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने पतीचा मृत्यू झाला. पत्नीने निधनाच्या आधी पाणी पिण्यासाठी मागवलं होतं. पती पाणी घेऊन पत्नीकडे गेला, मात्र तिने पाणी पिलं नाही. पत्नीचा मृत्यू झाला होता. हा धक्का पतीला सहन झाला नाही आणि अवघ्या 10 मिनिटात ते जमिनीवर कोसळले. खाली पडताच पतीचाही मृत्यू झाला (Husband and Wife Die on Same Day). मुली झाल्या म्हणून नवऱ्यानं घराबाहेर काढलं! हिंमत न हारता लक्ष्मीनं धरलंय बसचं स्टेरिंग हे प्रकरण बांसवाडा जिल्ह्यातील बस्सी चंदनसिंह गावचं आहे. इथे राहणाऱ्या रूपा गायरी यांच्या पत्नी केसर गायरी यांना दोन महिन्यांपूर्वी अर्धांगवायू झाला होता. तेव्हापासून त्या फक्त बेडवरच पडून असायच्या. उदयपूरमध्ये केसर यांच्यावर उपचार केले जात होते. शुक्रवारी त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितलं. हे ऐकताच त्यांचे पती रूपा, त्यांना पाणी देण्यासाठी गेले. रूपा यांनी पत्नीला पाणी दिलं असता तिने ते प्यायलं नाही. यानंतर वृद्धाने पत्नीची नाडी तपासली असता तिचं निधन झाल्याचं समजलं. हे पाहून रूपा यांना धक्काच बसला. दुःखात ते तिथून बाजूला झाले. यानंतर अवघ्या 10 मिनिटांत रूपा जमिनीवर कोसळले. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेलं. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पतीने केलं दुसरं लग्न; पहिल्या पत्नीने संतापाच्या भरात घर जाळलं; 4 जणांचा होरपळून मृत्यू बांसवाडा जिल्ह्यातील बस्सी चंदनसिंह गावात पहिल्यांदाच हा प्रकार घडला आहे. इथे पती-पत्नीचा एकत्र मृत्यू झाल्याच्या घटनेची चर्चा सुरू आहे. दोघांचा विवाह 55 वर्षांपूर्वी झाला होता. दोघांनीही आयुष्याचा बराच काळ एकत्र घालवला. पत्नीच्या मृत्यूचा धक्का रूपा यांना सहन झाला नाही. पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच रूपा यांचा मृत्यू झाला. ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पती-पत्नी दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Emotional, Shocking news, Wife and husband

    पुढील बातम्या