नवी दिल्ली, 16 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे सध्या देशात हाहाकार माजला आहे. भारतात 12 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोरोनाला रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे दिवसावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल झाले आहेत. अशा लोकांना दोन वेळेचं अन्नही मिळेनासे झाले आहे. अशातच काही वाहिन्यांनी आणि सोशल मीडियावर सरकारच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पैसे टाकणार असल्याचे मेसेज व्हायरल केले होते. मात्र हे सगळे दावे खोटे असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पीआयबीनं आज एक ट्वीट करत, सरकार कोणत्याही शहरांमध्ये हेलिकॉप्टरमधून पैसे टाकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही दिवसांपासून असे मेसेज व्हायरल गेले होते. मात्र हे सर्व दावे फेक असल्याचे सांगण्यात आले आहे. कर्नाटकातील एका वृत्तवाहिनीने अशा प्रकारची माहिती दिली होती. त्यानंतर सोशल मीडियावरही याबाबत मेसेज व्हायरल झाले होते.
वाचा-मेडिकल रिपोर्टमधली एक चूक आणि 66 वर्षांचे आजोबा निघाले कोरोना 'पॉझिटिव्ह'
Claim: Government is going to drop money from helicopters in every town#PIBFactCheck: Government is going to do no such thing pic.twitter.com/on7ZNsEXgT
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 16, 2020
वाचा-चीनने भारताला दिला धोका? 50 हजार PPE कीट गुणवत्ता चाचणीत फेल
लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असला तरी काही सवलती यामध्ये सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत. गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये शेती आणि ग्रामीण भागांतील विशिष्ट उद्योगांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर, हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, मेट्रो, शाळा, मॉल्स, जलतरण तलाव, जीम यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार आहेत. ही नियमावली हॉटस्पॉट किंवा सील झालेल्या भागांमध्ये लागू होणार नाही.
वाचा-VIDEO : लॉकडाऊनला कंटाळून रस्त्यावर आली महिला, पोलीस येताच काढले कपडे आणि...
कृषी कामं सुरू राहतील
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना सवलती देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या नियमावलीमध्ये शेती, शेतकरी संबंधित सर्व उपक्रम तसेच, शेतकऱ्यांना काम करण्याची परवानगी दिली जाणार आहे. कृषी उपकरणांची दुकाने, त्यांची दुरुस्ती व सुटे भागांची दुकाने खुली राहतील. खते, बियाणे, कीटकनाशके तयार करणे व त्यांचे वितरण करण्याचे काम चालूच राहतील, त्यांची दुकाने खुली असतील. एका राज्यातून दुसर्या राज्यात शेतीसंबंधित साहित्याची देवाणघेवाण केली जाऊ शकते.
संपादन- प्रियांका गावडे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona