नवी दिल्ली, 04 मे : संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या(coronavirus) संसर्गाशी झुंज देत आहे. भारतातही कोरोना विषाणूची प्रकरणं सातत्यानं वाढत आहेत. भारतात तिसर्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू झालं आहे. यावेळी, देशातील सर्व जिल्हे रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागली गेली आहेत आणि सर्व झोनमध्ये विविध प्रकारचे नियम लागू करण्यात आले आहेत. यादरम्यान, व्हॉट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला गेला आहे की, भारत सरकार सर्व बेरोजगारांना दरमहा 3500 रुपये देणार आहे. व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये असा दावा केला गेला आहे की, भारत सरकार ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना’ अंतर्गत सर्व बेरोजगारांना दरमहा 00 3500 देणार आहे. पण PIBFactCheck ने हा ादावा आणि दिलेली लिंक खोटी असल्याचं म्हटलं आहे. अशी कोणतीही योजना भारत सरकार चालवत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकांना रस्त्यावर पाहून मुख्यमंत्री भडकले; 30 मेपर्यंत दिला हा अल्टिमेटम
दावा - एक व्हाट्सएप मैसेज में यह दावा किया गया है कि 'प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना' के अंतर्गत भारत सरकार सभी बेरोजगारों को प्रतिमाह ₹ 3500 दे रही है#PIBFactCheck: किया गया दावा और दिया गया ब्लॉग लिंक फर्जी है| भारत सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है pic.twitter.com/27yluwbpdq
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 4, 2020
या मेसेजमध्ये असा दावा केला गेला आहे की, ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना’ अंतर्गत भारत सरकार सर्व बेरोजगारांना दरमहा 3500 रुपये भत्ता देत आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी) फॅक्ट चेकने या मेसेजला बनावट मेसेज म्हटलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंबंधी ट्विट केलं आहे.
299 लोक याबद्दल बोलत आहेत कोव्हिड-19 च्या साथीमुळे अनेक फेक मेसेज व्हायरल होत आहे. नुकताच व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर एक मेसेज व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की केंद्र सरकारनं नवीन प्रकल्प सुरू केला आहे. या मोहिमेचं नाव आहे ‘राष्ट्रीय शिक्षित बेरोजगार योजना’ आणि त्याअंतर्गत कोव्हिड-19 च्या विरोधात लढणाऱ्या योद्धांसाठी 50,000 रुपये भत्ता देण्यात येणार आहे. पीआयबी फॅक्ट चेकनेही या मेसेजलाही बनावट म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटात कशी पार पडणार आषाढी वारी? अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष संपादन - रेणुका धायबर