PIB Fact Check: काय सांगता! मोदी सरकार देणार तुमच्या मुलीच्या लग्नासाठी 40 हजार? वाचा सत्य

PIB Fact Check: काय सांगता! मोदी सरकार देणार तुमच्या मुलीच्या लग्नासाठी 40 हजार? वाचा सत्य

केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री कन्या विवाह योजना अंतर्गत कोणत्याही अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार नाही आहेत, असे पीआयबीनं स्पष्ट केले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : सोशल मीडियावर सध्या एक न्यूज व्हायरल होत आहे. यात असा दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री कन्या विवाह योजना’ अंतर्गत मुलींच्या विवाहासाठी 40 हजार रुपये देत आहे. या बातमीनंतर लोकांनी अनेक ट्वीट आणि पंतप्रधानांना पत्र लिहिली. मात्र पीआयबी फॅक्ट चेकमध्ये (PIB Fact Check) हा दावा खोटा असल्याचे सांगण्यात आले आहे. पीआयबीनं ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच, कोणत्याही अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. याचबरोबर अशीच कोणता योजना नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दावा- Youtube वरील एका व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला होता, यात केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री कन्या विवाह योजना’ अंतर्गत मुलींच्या विवाहासाठी ₹40,000 रुपये रोख रक्कम देणार आहे.

वाचा-4 वर्षाच्या चिमुरडीने गायलं वंदे मातरम्; पंतप्रधान मोदींनीही शेअर केला VIDEO

खोटा आहे हा दावा

PIB Fact Check टीमनं हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री कन्या विवाह योजना अंतर्गत कोणत्याही अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार नाही आहेत.

वाचा-आजपासून OTP शिवाय येणार नाही गॅस सिलेंडर, जाणून घ्या काय आहे तुमचा बुकिंग नंबर

जाणून घ्या सत्य

व्हायरल होत असलेली ही बातमी फेक आहे. केंद्र सरकारच्या वतीनं अशी कोणतीही योजना सुरू करण्यात आलेली नाही आहे. पीआयबीनं ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. कोरोना काळात देशभर ज्या प्रकारची परिस्थिती आहे, त्या अनेक खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत. भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने या व्हायरल बातमीस नकार दिला आहे. सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.

वाचा-LPG गॅस सिलेंडरच्या नोव्हेंबरच्या किंमती जाहीर, असे आहेत मुंबईतील नवे दर

तुम्हीही करू शकता फॅक्ट चेक

जर तुम्हाला असे कोणते खोटो मेसेज अथवा बातम्या येत असतील तर तुम्ही त्या https://factcheck.pib.gov.in/ किंवा 918799711259 या क्रमांकावर अथवा pibfactcheck@gmail.com पाठवू शकता.

Published by: Priyanka Gawde
First published: November 1, 2020, 12:43 PM IST
Tags: wedding

ताज्या बातम्या