मराठी बातम्या /बातम्या /मनी /

LPG Gas Cylinder Price 01 November 2020: LPG गॅस सिलेंडरच्या नोव्हेंबरच्या किंमती जाहीर, असे आहेत मुंबईतील नवे दर

LPG Gas Cylinder Price 01 November 2020: LPG गॅस सिलेंडरच्या नोव्हेंबरच्या किंमती जाहीर, असे आहेत मुंबईतील नवे दर

जर ग्राहकाचा मोबाईल नंबर अपडेट नसेल, तर डिलिव्हरी पर्सनकडे एक app असेल, त्या appद्वारे ग्राहक आपला मोबाईल नंबर अपडेट करू शकेल आणि कोड जनरेट करेल. म्हणजे, डिलिव्हरीवेळीच ग्राहकांना आपला अपडेट नसलेला मोबाईल नंबर appद्वारे, डिलिव्हरीबॉयकडून अपडेट करून घेता येईल. त्यामुळे Real time बेसिसवर मोबाईल नंबर अपडेट होईल. मोबाईल नंबर अपडेट झाल्यावर लगेच कोडही जनरेट होण्याची सुविधा देण्यात आली आहे.

जर ग्राहकाचा मोबाईल नंबर अपडेट नसेल, तर डिलिव्हरी पर्सनकडे एक app असेल, त्या appद्वारे ग्राहक आपला मोबाईल नंबर अपडेट करू शकेल आणि कोड जनरेट करेल. म्हणजे, डिलिव्हरीवेळीच ग्राहकांना आपला अपडेट नसलेला मोबाईल नंबर appद्वारे, डिलिव्हरीबॉयकडून अपडेट करून घेता येईल. त्यामुळे Real time बेसिसवर मोबाईल नंबर अपडेट होईल. मोबाईल नंबर अपडेट झाल्यावर लगेच कोडही जनरेट होण्याची सुविधा देण्यात आली आहे.

LPG Gas Cylinder Price 01 November 2020: एकीकडे बाजारात बटाटे, कांदा, डाळींचे दर वाढत असताना गॅस सिलेंडरचे दर सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बाब मानली जात आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : वाढत्या महागाईत नोव्हेंबरमधील गॅस सिलेंडरच्या किंमतींनी सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) नोव्हेंबर महिन्यातील किंमती न बदलण्याचा निर्णय सरकारी तेल कंपन्यांनी घेतला आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यातही HPCL, BPCL, IOC यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल केला नव्हता. एकीकडे बाजारात बटाटे, कांदा, डाळींचे दर वाढत असताना सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बाब मानली जात आहे. मात्र 19 किलो कमर्शिअल गॅस सिलेंडरची (Commercial Gas Cyliner Price) किंमत 78 रुपयांपर्यंत वाढली आहे. तर मुंबईत सब्सिडी नसलेल्या सिलेंडरची किंमत 594 रुपये असणार आहे.

यापूर्वी जुलै 2020 मध्ये 14 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 4 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याच वेळी, जूनमध्ये दिल्लीमध्ये 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडर 11.50 रुपयांनी महाग झाले, मेमध्ये ते 162.50 रुपयांनी स्वस्त झाले.

वाचा-आजपासून OTP शिवाय येणार नाही गॅस सिलेंडर, जाणून घ्या काय आहे तुमचा बुकिंग नंबर

अशा आहेत किंमती

देशातील सर्वात मोठी तेल विपणन कंपनी IOC च्या वेबसाइटवर दिलेल्या किंमतीनुसार दिल्लीतील सिलेंडरचे दर स्थिर राहिले आहेत. गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये किंमती होत्या त्याच किंमती असणार आहे. मुंबईत सब्सिडी नसलेल्या सिलेंडरची किंमत 594 रुपये असणार आहे.

कमर्शिअल सिलेंडरच्या किंमतीत वाढ

नोव्हेंबर महिन्यासाठी 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत वाढली आहे. चेन्नईने जास्तीत जास्त 78 रुपये सिलेंडरची वाढ केली आहे. आता येथे व्यावसायिक सिलेंडरसाठी 1,354 रुपये द्यावे लागतील. कोलकाता आणि मुंबईत प्रति सिलेंडरमध्ये 76 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर या दोन शहरांमधील नवीन दर अनुक्रमे 1,296 आणि 1,189 रुपये आहेत. राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाल्यास, आता तुम्हाला व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1,241 रुपये द्यावे लागतील.

वाचा-नंबर, OTP नाही तर सिम स्वॅपकरून एका सेकंदात बॅंक अकाउंट होणार रिकामं

गॅस सिलेंडर बुकिंगसाठी द्यावा लागणार ओटीपी

सिलेंडरची डिलिव्हरी घेताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. या नवीन प्रणालीला DAC असे नाव देण्यात आले आहे, म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (Delivery Authentication Code). आता केवळ सिलेंडर बुक केल्यानंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही, तर तुमच्या रजिस्टर्ड फोन क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल. डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला हा कोड सांगावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल. तेल कंपन्या हा प्रयोग सुरुवातीला 100 स्मार्ट सिटीजमध्ये लागू करणार आहे. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल.

First published: