मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आजपासून OTP शिवाय येणार नाही गॅस सिलेंडर, जाणून घ्या काय आहे तुमचा बुकिंग नंबर

आजपासून OTP शिवाय येणार नाही गॅस सिलेंडर, जाणून घ्या काय आहे तुमचा बुकिंग नंबर

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, आता देशभरातील indane घरगुती गॅसच्या ग्राहकांना, LPG सिलेंडर बुक करण्यासाठी 7718955555 या क्रमांकावर SMS पाठवावा लागेल.

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, आता देशभरातील indane घरगुती गॅसच्या ग्राहकांना, LPG सिलेंडर बुक करण्यासाठी 7718955555 या क्रमांकावर SMS पाठवावा लागेल.

LPG बुकिंगच्या नियमात झाला मोठा बदल, जाणून घ्या नियम नाहीतर येणार नाही गॅस सिलेंडर.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : जर तुम्ही एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) वापरत असाल तर आजपासून 1 नोव्हेंबरपासून इंडेन गॅस (Indane Gas) बुकिंगचा नंबर बदलणार आहे. त्यामुळे आता तुम्ही OTP गॅस बुकिंग करू शकत नाही. आजपासून गॅस सिलेंडरच्या नियमात काय बदल केले जात आहेत.

देशातील सर्वात मोठी तेल विपणन कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (IOCL) इंडेन गॅसची रिप्लेसमेंट बुकिंग क्रमांक बदलला आहे. Indane नं आपल्या LPG ग्राहकांसाठी एक नवीन नंबर जाहीर केला आहे. आपण IVR किंवा SMSद्वारे इंडेन गॅस बुकिंगसाठी हा नंबर वापरू शकता. आता इंडेन गॅस ग्राहक एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी 7718955555 वर कॉल किंवा एसएमएस करू शकतात. आपण आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर 7588888824 वर REFILL टाइप करून गॅस सिलेंडर देखील बुक करू शकता.

वाचा-नंबर, OTP नाही तर सिम स्वॅपकरून एका सेकंदात बॅंक अकाउंट होणार रिकामं

गॅस सिलेंडर बुकिंगसाठी द्यावा लागणार ओटीपी

सिलेंडरची डिलिव्हरी घेताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. या नवीन प्रणालीला DAC असे नाव देण्यात आले आहे, म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (Delivery Authentication Code). आता केवळ सिलेंडर बुक केल्यानंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही, तर तुमच्या रजिस्टर्ड फोन क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल. डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला हा कोड सांगावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल. तेल कंपन्या हा प्रयोग सुरुवातीला 100 स्मार्ट सिटीजमध्ये लागू करणार आहे. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल.

वाचा-आजपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, माहित नसल्यास खिशावर होणार थेट परिणाम

Indane ने बदलला बुकिंग क्रमांक

तुम्ही जर इंडेनचे ग्राहक असाल तर तुम्ही जुन्या क्रमांकावरून आता एलपीजी गॅसचे बुकिंग करू शकणार नाही. इंडेनने त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर बुकिंगचा नवा क्रमांक पाठवला आहे. याआधी इंडियन ऑइलने अशी माहिती दिली होती की, घरगुती गॅस बुकिंगसाठी देशात वेगवेगळ्या सर्कलसाठी वेगवेगळे मोबाइल क्रमांक आहेत.

वाचा-दावा: जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार 100 रुपये, हे आहे सत्य

बदलणार एलपीजी गॅसच्या किंमती

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल मार्केटिंग कंपन्या एलीपीजी सिलेंडरच्या नव्या किंमती जारी करतात. यानुसार किंमती वाढू देखील शकतात किंवा कमी सुद्धा होऊ शकतात. ऑक्टोबरमध्ये तेल मार्केटिंग कंपन्यांनी कमर्शिअल सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली होती.

First published:

Tags: Gas