4 वर्षाच्या चिमुरडीने गायलं वंदे मातरम्; पंतप्रधान मोदींनीही शेअर केला VIDEO म्हणाले...

4 वर्षाच्या चिमुरडीने गायलं वंदे मातरम्; पंतप्रधान मोदींनीही शेअर केला VIDEO म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एस्थर नान्ते (Esther Hnamte) या 4 वर्षाच्या चिमुरडीचा वंदे मातरम् गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि तिचं भरभरुन कौतुक केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर: भारतीयांच्या मनामध्ये देशाविषयी प्रचंड प्रेम आणि अभिमान आहे. मग ती मोठी माणसं असोत किंवा अगदी लहान मुलं. याचच दर्शन घडलं आहे मिझोराममध्ये. एस्थर नाम्ते (Esther Hnamte) नावाच्या एका चार वर्षाच्या चिमुरडीने अतिशय सुंदररित्या, बिनचूक वंदे मातरम् या गीताचं सादरीकरण केलं आहे. तिने गायलेलं गाणं सोशल मीडिया (Social Media)वर चांगलंच हिट होतं आहे. तिचा व्हिडीओ मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथांगा (Zoramthanga)यांनी त्यांच्या ट्विटअर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही तिच्या गाण्याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "एस्थर नास्ते आम्हाला तुझ्यावर गर्व आहे. अतिशय उत्तमरित्या सादरीकरण केलं आहेस". एस्थरच्या व्हिडीओला 33.67 लाख व्ह्यूज आहेत. एस्थरच्या यू ट्यूब चॅनलवर 73 हजारांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झाले आहेत. 25 ऑक्टोबर रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.

एस्थर नान्ते ही मिझोरमच्या लुंगलेईची रहिवासी आहे. भारतामध्ये विविध भाषा, धर्म, प्रांताची लोक राहत असूनसुद्धा आपण एक आहोत. आणि सर्व भारतीयांमध्ये देशप्रेमाची भावना आहे हे या व्हिडीओमधून दिसून येतं. ए. आर रहमान यांचं 'मा तुझे सलाम..वंदे मातरम्' हे गाणं गायलं आहे. ए.आर रहमान यांनीही तिची व्हिडीओ रिट्विट केला आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 1, 2020, 11:20 AM IST

ताज्या बातम्या