पत्रकार ठरला देवदूत; आत्महत्येसाठी नदीत उडी घेतलेल्या युवकाला मृत्यूच्या दारातून आणलं परत

पत्रकार ठरला देवदूत; आत्महत्येसाठी नदीत उडी घेतलेल्या युवकाला मृत्यूच्या दारातून आणलं परत

डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्याला कंटाळून एका 35 वर्षीय युवकानं नदीमध्ये उडी घेत आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवानं वेळेवर घटनास्थळी पोहोचलेल्या पत्रकारानं या युवकाचा जीव वाचवला.

  • Share this:

अहमदाबाद 10 मे : डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्याला कंटाळून एका 35 वर्षीय युवकानं नदीमध्ये उडी घेत आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवानं वेळेवर घटनास्थळी पोहोचलेल्या दैनिक भास्कर या वृत्तपत्राच्या फोटो जर्नालिस्ट (Photo Journalist) रितेश पटेल यांनी या युवकाचा जीव वाचवला आहे. ब्रिजवरुन उडी घेतल्यानंतर हा युवक लोखंडाच्या एका अँगलला लटकत होता. ही घटना गुजरातच्या इच्छापोरमध्ये शनिवारी घडली आहे.

या युवकानं आत्महत्या करण्यासाठी ONGC ब्रिजवरुन तापी नदीमध्ये (Tapi River) उडी घेतली. अशात रितेशनं त्याचा हात पकडला आणि आसपास उपस्थित लोकांना हाक देत बोलावून घेतलं. यानंतर सर्वांनी मिळून त्या युवकाला बाहेर काढलं. विवेकनं आपलं काम करण्याासोबतच माणुसकीचं कर्तव्यही पार पाडलं आहे. यानंतर त्यानी पोलीस कंट्रोल रुममध्ये फोन करुन घटनेच्या माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि युवकाला आपल्यासोबत घेऊन गेले.

बीडमध्ये मराठा समाज आक्रमक; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची केली होळी

रितेश यांनी सांगितलं, की ते फोटो काढण्यासाठी आपल्या कारनं मगदल्लाकडे निघाले होते. तेव्हाच त्यांचं लक्ष ब्रिजवरुन उड्या घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाकडे गेलं. तात्काळ आपली गाडी थांबवत ते पळत त्या युवकाला वाचवण्यासाठी गेले आणि त्याला बाहेर काढलं.

इच्छापोर ठाण्याचे पोलीस स्वप्नील पंड्या यांनी सांगितलं, की आम्ही भाविक विपिन मेहता याला पोलीस ठाण्यात आणलं आहे. चौकशीदरम्यान त्यानं सांगितलं, की त्याच्यावर कर्ज असल्यानं तो आत्महत्येचं पाऊल उचलत होता. शेअर बाजारात त्याचं मोठं नुकसान झालं होतं. पोलिसांनी त्याची समजूत काढत त्याच्या कुटुंबीयांसोबत त्याला घरी पाठवलं आहे.

Published by: Kiran Pharate
First published: May 10, 2021, 3:38 PM IST

ताज्या बातम्या