मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maratha Reservation: बीडमध्ये मराठा समाज आक्रमक; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची केली होळी

Maratha Reservation: बीडमध्ये मराठा समाज आक्रमक; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची केली होळी

Maratha Reservation protest in Beed: बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची होळी (Protest against supreme court verdict) केली आहे. जमलेल्या संतप्त जमावानं केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांच्या विरुद्ध जबरदस्त घोषणाबाजी देखील केली आहे.

पुढे वाचा ...
बीड, 10 मे: अलीकडेच मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) सुप्रीम कोर्टानं (Supreme court verdict) महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील मागील सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण असंवैधानिक आहे, असं नमूद करत सर्वोच्च न्यायालयानं मुंबई हायकोर्टाचा निकाल रद्दबातल ठरवला होता. '50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणं हे राज्यघटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणं हे कायद्याचं उल्लंघन आहे', असंही न्यायालयाने यावेळी म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटले होते. तर अनेकांनी न्यायालयाच्या विरोधात जाऊन आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. यानंतर आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होताना दिसत आहे. याचे पडसाद नुकतेच बीडमध्ये दिसले आहेत. याठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची होळी (Protest against supreme court verdict) केली आहे. जमलेल्या संतप्त जमावानं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याविरुद्ध जबरदस्त घोषणाबाजी केली आहे. आता न्यायालयाच्या निकालाची होळी केली आहे. पण येत्या काही दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर आमदार आणि खासदाराचीही होळी करू असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला. आज दुपारी बीडमध्ये मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. त्यानंतर माने कॉम्प्लेक्स परिसरात अनेक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन केंद्र आणि राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत मराठा आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत देखील जाळण्यात आली. यामुळे बीडमध्ये आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होताना दिसत आहे. हे ही वाचा- Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय दुसरीकडे न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं होतं की, मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास वर्गात मोडत नाही. जे मागास समाजातील वर्ग आहे, त्यांना आरक्षण लागू असणार आहे. राज्य सरकारने तातडीची बाब म्हणून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता राज्यात कुठेही अशी परिस्थिती नाही. त्यामुळे 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याबाबत पुन्हा चर्चा होऊ शकत नाही, न्यायमूर्तींनी यावेळी म्हटलं होतं.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Beed, Maratha reservation, Protest, Supreme court decision

पुढील बातम्या