• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • COVAXIN घेतलेल्यांना COVISHIELD घेण्याची परवानगी द्यावी, सर्वोच्च न्यायालयात याचिका

COVAXIN घेतलेल्यांना COVISHIELD घेण्याची परवानगी द्यावी, सर्वोच्च न्यायालयात याचिका

ज्या भारतीयांनी कोव्हॅक्सिन लसीचे डोस घेतले आहेत, त्यांना आता कोव्हिशिल्ड (Petition in SC seeks permission to take Covishield vaccine after Covaxin) लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : ज्या भारतीयांनी कोव्हॅक्सिन लसीचे डोस घेतले आहेत, त्यांना आता कोव्हिशिल्ड (Petition in SC seeks permission to take Covishield vaccine after Covaxin) लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कोव्हॅक्सिनला जागतिक (Permission for Covaxin still awaited) आरोग्य संघटनेत आपातकालीन वापरसाठी परवानगी मिळण्याच्या प्रक्रियेला उशीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही याचिका सादर करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेअभावी कोव्हॅक्सिन (Issues faced by Covaxin takers) लस घेतलेल्या नागरिकांना देशाबाहेर जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांना कोव्हिशिल्ड लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काय म्हणालं न्यायालय? नागरिकांनी कुठली लस घ्यावी किंवा एका लसीवर दुसरी लस घेतलेली चालेल का, हा वैद्यकीय प्रश्न असून तो कोट्यवधी नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालय काही निर्णय़ घेऊ शकणार नाही, असं वाटत असल्याचं न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी मात्र होणार असून दिवाळीनंतर सुनावणीदतची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. वाट पाहण्याचा सल्ला कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांना कोव्हिशिल्ड घेण्यासाठी परवानगी मागणाऱ्या याचिकाकर्त्यांना प्रतीक्षा करण्याचा सल्ला न्यायालयानं दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेसोबत भारत बायोटेकच्या अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. लवकरच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत संयम ठेवण्याचा सल्लाही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिला आहे. हे वाचा- महाराष्ट्रात नव्या घातक Variant चा धोका, या पाच राज्यांमध्ये शिरकाव देशात लसीकरणाला वेग भारतात आतापर्यंत 1 अब्ज 4 कोटी 86 लाख 689 डोस दिले आहेत. कोविन पोर्टलवर जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार 72 कोटी 80 लाख नागरिकांना पहिला डोस देण्याचं काम पूर्ण झालं आहे. तर 32 कोटी 6 लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. मात्र कोव्हॅक्सिनचा डोस घेतलेल्या नागरिकांना परदेश प्रवासात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. लवकरच कोव्हॅक्सिनला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा भारत बायोटेकनं व्यक्त केली आहे.
  Published by:desk news
  First published: