मराठी बातम्या /बातम्या /देश /कोरोना व्हायरसच्या नव्या घातक Variant चा धोका, महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये शिरकाव

कोरोना व्हायरसच्या नव्या घातक Variant चा धोका, महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये शिरकाव

Corona Virus Updates: AY.4.2 भारतातील प्रकरणे आता वाढू लागली आहेत. भारतातल्या पाच राज्यात या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले.

Corona Virus Updates: AY.4.2 भारतातील प्रकरणे आता वाढू लागली आहेत. भारतातल्या पाच राज्यात या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले.

Corona Virus Updates: AY.4.2 भारतातील प्रकरणे आता वाढू लागली आहेत. भारतातल्या पाच राज्यात या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले.

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर: एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशात कोरोना व्हायरसचा (Covid-19) प्रार्दुभाव नियंत्रणात आला असताना आता पुन्हा एकदा कोरोनाच्या (Corona Virus Variant) नव्या व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. कोरोना विषाणूच्या AY.4.2 या नव्या व्हेरिएंटने (Corona New Variant) चिंता वाढवली आहे. AY.4.2 भारतातील प्रकरणे आता वाढू लागली आहेत. भारतातल्या पाच राज्यात या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले.

भारतात AY.4.2 व्हेरिएंटची प्रकरणे आता कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र या राज्यांमध्येही आढळून आली आहेत. या नव्या व्हेरिएंटचा अभ्यास सुरु आहे. तसंच हा व्हेरिएंट डेल्टा प्लस व्हेरियंटचाच प्रकार असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा-  क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाची चौकशी कोण करणार?, NCB नं दिलं उत्तर

सुरुवातीला इंदौरमध्ये जीनोम सिक्वेन्सिंग तपास अहवालात AY-4 चे नवीन व्हेरिएंट आढळून आली. नमुन्याच्या चाचणी अहवालात नव्या व्हेरिएंटची 7 प्रकरणं समोर आली.

ICMR ने दिली मोठी माहिती

हा व्हेरिएंट अधिक संसर्गक्षम (Caontagious) वाटत असला, तरी घातक (Fatal) असल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही, असं मत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. तरीही नागरिकांनी कोविडच्या अनुषंगाने आवश्यक (Covid Appropriate Behavious) ती सर्व खबरदारी घ्यावी, असं आवाहन शास्त्रज्ञांनी केलं आहे. आतापर्यंत देशात कोरोनाच्या AY.4.2 या व्हेरिएंटचे 17 नमुने सापडले आहेत.

आयसीएमआरचे शास्त्रज्ञ सुमीरन पांडा (Sumiran Panda) यांच्याशी न्यूज 18 ने संवाद साधला. त्या वेळी त्यांनी सांगितलं, 'नवा डेल्टा व्हेरिएंट (New Delta Variant) जास्त संसर्गक्षम वाटत आहे. तसंच तो यापेक्षाही जास्त संसर्गक्षम असू शकतो. विषाणू स्वतःला जिवंत राखण्यासाठी स्वतःमध्ये असे बदल करत जातो. कारण त्याला होस्टचं शरीर म्हणजेच मानवी शरीरात राहण्याची आवश्यकता असते; मात्र हा व्हेरिएंट घातक आहे की नाही, याबद्दल आत्ताच काही सांगणं कठीण आहे.' 'आपण पॅनिक होऊन चालणार नाही. त्याऐवजी आपली सतर्कता आणि दक्षता वाढवली पाहिजे. कोविडच्या अनुषंगाने आपले व्यवहार योग्य ती काळजी घेऊन करणं गरजेचं आहे. बेपर्वाईने वागणं योग्य नाही,' असंही पांडा यांनी सांगितलं.

हेही वाचा-  Breaking News: महिला शेतकरी आंदोलकांना ट्रकनं चिरडलं, तिघींचा मृत्यू

GISAIDने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या AY.4.2 या व्हेरिएंटच्या देशात सापडलेल्या 17 नमुन्यांमध्ये आंध्र प्रदेशातल्या 7, कर्नाटकातल्या 2, तेलंगणमधल्या 2, केरळमधल्या 4 आणि जम्मू-काश्मीर व महाराष्ट्रातल्या प्रत्येकी एका नमुन्याचा समावेश आहे. अमेरिकी शास्त्रज्ञ एरिक टोपोल यांनी 24 ऑक्टोबरला केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलं होतं, 'डेल्टा प्लस नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोरोनाच्या AY.4.2 या डेल्टा व्हेरिएंटच्या सब लायनेजचे 10 टक्के रुग्ण ब्रिटनमध्ये अलीकडेच सापडले असून, त्यांच्या सिक्वेन्समुळे चिंता वाढली आहे.'

या पार्श्वभूमीवर पांडा यांनी सांगितलं, की 'AY.4.2 हा व्हेरिएंट अद्याप व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट म्हणून ओळखला जात आहे. त्यावर संशोधन सुरू आहे. क्लस्टरवर आधारित अभ्यासातून येत्या काही दिवसांत या व्हेरिएंटची वैशिष्ट्यं उघड होतील.'

हेही वाचा- समीर वानखेडे कुटुंबीयांची नवाब मलिकांविरोधात कारवाई, क्रांती रेडकर यांची प्रतिक्रिया

पांडा यांच्या म्हणण्यानुसार, लसीकरण (Vaccination) करून घेणं आणि मास्कचा (Mask) वापर करणं या दोन्ही गोष्टींचा अवलंब आवश्यक आहे. 'कोरोनाचा व्हेरिएंट जुना असो ना नवा, त्यांचा फैलाव होण्याची पद्धत एकसारखीच आहे. त्यामुळे मास्क वापरा आणि सार्स-सीओव्ही टूला हरवा. मास्क संसर्ग होण्यापासून बचाव करेल. संसर्ग झालाच तर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापासूनचं आणि मृत्यूची शक्यता कमी करण्याचं संरक्षण लस देईल. म्हणून लस आणि मास्क या दोन गोष्टींचं पालन केलं, तर कोणताही व्हेरिएंट किंवा म्युटेशन असलं, तरी काही फरक पडत नाही,' असं पांडा यांनी नमूद केलं.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus