मुंबई, 23 जून : लडाखमधील भारत-चीन चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. यामध्ये चीनचेही अनेक सैनिक मारले गेले आहेत. यादरम्यान चीनच्या कुरापती सुरूच असल्याचं दिसून येत आहे. या चकमकीनंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भारतातील पायाभूत सुविधा, बँकिंग आणि माहिती क्षेत्रातील सायबर स्पेसमध्ये चीनकडून सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 4-5 दिवसांत चीनकडून 40300 सायबर हल्ले करण्यात आले आहेत, अशी माहिती यशस्वी यादव, विशेष आयजी सायबर विभागाकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र सायबर विभाग चिनी सायबर हल्ल्यांविरोधात मोठ्या प्रमाणात फिशिंग हल्ल्याची योजना तयार करीत आहे. याबाबत महाराष्ट्र सायबर विभागाने नियमावली जारी केली आहे.