मराठी बातम्या /बातम्या /india-china /मोठा खुलासाः गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर हल्ला करण्याचा चीननेच दिला होता आदेश

मोठा खुलासाः गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर हल्ला करण्याचा चीननेच दिला होता आदेश

गेल्या आठवड्यामध्ये एका सीनिअर चिनी जनरलने त्याच्या सैन्यास भारतीय सेनेवर हल्ला करण्याचे आदेश दिले, असे अमेरिकेन गुप्तचर संघटनेने स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवड्यामध्ये एका सीनिअर चिनी जनरलने त्याच्या सैन्यास भारतीय सेनेवर हल्ला करण्याचे आदेश दिले, असे अमेरिकेन गुप्तचर संघटनेने स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवड्यामध्ये एका सीनिअर चिनी जनरलने त्याच्या सैन्यास भारतीय सेनेवर हल्ला करण्याचे आदेश दिले, असे अमेरिकेन गुप्तचर संघटनेने स्पष्ट केले आहे.

  नवी दिल्ली, 23 जून : गलवान खोऱ्यातील चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. usअमेरिकन गुप्तचर संघटनेच्या अहवालानुसार या पाशवी हल्ल्यामध्ये डझनभर सैनिक मारले गेले त्याचप्रमाणे आशिया खंडातील दोन महत्वाचे पॉवरहाऊस देश असणाऱ्या चीन आणि भारतामध्ये तणाव वाढला.  यूएस न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

  वेस्टर्न थिएटर कमांडचे प्रमुख जनरल झाओ झोंगकी आणि पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये अजूनही कार्यरत असलेल्या काही जेष्ठांनी उत्तर भारत आणि दक्षिणपश्चिम चीनच्या प्रतिस्पर्धी सीमावर्ती भागाच्या कारवाईला मान्यता दिली. या अहवालाशी संबधित सूत्राने नाव न घेण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. त्यांनी अशी देखील माहिती दिली की, झाओ पूर्वीपासूनच भारतातील कामकाजवर लक्ष ठेवून होते. त्यांनी याआधी देखील अशी चिंता होती की अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांकडून होणारे शोषण टाळण्यासाठी चीन कमकुवत दिसेल. म्हणून 'Teach India A Lesson' अर्थात भारताला धडा शिकवण्यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात फेसऑफचा पर्याय निवडला.

  (हे वाचा-सीमा पार करणाऱ्या चिनी सैनिकांची भारतीय जवानांनी केली धुलाई, VIDEO व्हायरल)

  गेल्या आठवड्यात काय घडले याविषयी चीनचे दावे आणि अमेरिकन गुप्तचर संघटनेच्या मूल्यांकनात विरोधाभास आहे. या हल्ल्यामध्ये साधारण 20 भारतीय सैैनिक मारण्यात आले तर 35 चिनी सैनिक मारले गेले. त्याचप्रमाणे मीडिया अहवालांनुसार दोन्ही बाजुंना काही सैनिक मारण्यात आले तर त्यानंतक ते सोडण्यात देखील आले.  ही प्राणघातक आणि वादग्रस्त घटना नियंत्रणाबाहेर गेलेल्या तणावाचा परिणाम नव्हता. पण भारताला चीनच्या ताकदीचा संदेश पाठवण्यासाठी घेतलेला बिजींगचा हेतपूर्ण निर्णय होता. असे या अहवालात सांगण्यात आले आहे.

  (हे वाचा-गलवानमधील शहीद कर्नलच्या कुटुंबीयांना 5 कोटींची मदत; पत्नीला सरकारी नोकरीत)

  मात्र चीनच्या या प्लॅनमुळे तणाव वाढला आहे, कारण या एका घटनेमुळे त्याचे तीव्र पडसाद भारतामध्ये उमटले आहेत. भारतात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

  First published:
  top videos

   Tags: India china border