Home /News /national /

लोकांची दिवाळी आता सरकारच्या हाती, व्याजमाफीचा निर्णय लवकर घ्या; सुप्रीम कोर्टाची केंद्राला सूचना

लोकांची दिवाळी आता सरकारच्या हाती, व्याजमाफीचा निर्णय लवकर घ्या; सुप्रीम कोर्टाची केंद्राला सूचना

चक्रव्याढ व्याज आकारणे हा काही दिलासा नाही. त्यामुळे व्याज माफ करावी अशी मागणी करत लोकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

    नवी दिल्ली 14 ऑक्टोबर: कर्जदारांच्या व्याजावर बँकांनी लावलेलं चक्रव्याढ व्याज माफ करण्याची घोषणा सरकारने केली होती. याबाबतची अधिसूचना तातडीने काढावी असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आहे. या निर्णयावरच लोकांची दिवाळी अवलंबून असून सरकारने या सदंर्भात गांभीर्याने विचार करावा असंही कोर्टाने म्हटलं आहे. कोरोना संकटामुळे सरकारने लोन मोरेटोरियम जाहीर केला होता. त्यामुळे हफ्ते भरू न शकणाऱ्या कर्जदात्यांना त्याचा फायदा झाला. मात्र बँकांनी कर्जदारांच्या व्याजावर व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज लावलं होतं. त्यामुळे कर्जाची रक्कम प्रचंड प्रमाणात वाढली होती. त्या संदर्भातल्या प्रकरणावर सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की, सरकारने सहा महिन्यांचं मोरेटोरियम दिलं होतं. त्या काळातल्या दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज असलेल्यांचं व्याज सरकारने माफ केलं आहे. याचा फॉर्म्युला काढण्याचं काम सुरू असून 15 नोव्हेंबरच्या आधी त्याची अधिसूचना जारी करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. जस्टिस अशोक भूषण यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. लोकांची दिवाळी ही आता सरकारच्या हातात असून, जेवढ्या लवकर निर्णय घ्याल तेवढं सरकारच्या हिताचं आहे असं मत अशोक भूषण यांनी व्यक्त केलं. 'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या आजी-आजोबांची प्यारवाली लव्हस्टोरी, कधी झालं लग्न? कोरोनाच्या 6 महिन्यांच्या संकट काळात लोक 6 महिन्यांपर्यंत कर्जाचे हफ्ते भरू शकले नाही तरी चालेल. मात्र नंतर त्यांना त्यावरचं व्याज द्यावं लागेल असं म्हटलं होतं. त्यामुळे या निर्णयाविरोधात लोकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. असं व्याज आकारणे हा काही दिलासा नाही. त्यामुळे व्याज माफ करावी अशी मागणी करण्यात आली होती. सरकारने आता व्याज माफ करण्याचा निर्णय जाहीर केलाय. पण त्याची नेमकी नियमावली जाहीर केलेली नाही. मुसळधार पावसामुळे एका क्षणात कोसळली इमारत, पाहा थरकाप उडवणारा VIDEO या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, व्यवसाय बंद झाले होते. त्यामुळे कोट्यवधी लोक कर्जाचे हफ्ते भरू शकले नाहीत. त्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र व्याजावरही व्याज लागल्याने नव्या रकमा पाहून लोकांचे डोळेच पांढरे झाले होते. आता 2 कोटींपर्यंतच्या कर्जाचं व्याज माफ झाल्याने कर्जदात्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र नवे नियम करताना त्यात छुप्या अटी नसाव्यात असं मतही व्यक्त होत आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Suprim court

    पुढील बातम्या