'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या आजी-आजोबांची प्यारवाली लव्हस्टोरी; वाचून तुम्हीही म्हणाल, सो क्यूट !

'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या आजी-आजोबांची प्यारवाली लव्हस्टोरी; वाचून तुम्हीही म्हणाल, सो क्यूट !

सोशल मीडियावर व्हायरल झालेला 'बाबा का ढाबा' जोमात सुरू आहे. बाबा का ढाबा चालवणाऱ्या या आजी-आजोबांची लव्हस्टोरीसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर: सोशल मीडिया हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडियावर नेहमीच मीम्स, फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हे फक्त टाईमपासचं साधन नाही, अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक बातम्या समोर समोर येतात. लोकांची दु:ख, त्यांच्या अडचणी सोशल मीडियाच्याच माध्यमातून सगळ्या जगापर्यंत पोहोचतात.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'बाबा का ढाबा' ही पोस्ट हिट झाली होती. दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये कांताप्रसाद नावाचे आजोबा जेवणाचं छोटसं दुकान चालवतात. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण लॉकडाऊनमुळे आजोबा आर्थिक संकटात सापडले होते. सोशल मीडियावर एका व्यक्तीने पोस्ट शेअर केल्यानंतर 'बाबा का ढाबा'समोर लोकांनी अक्षरक्ष: रांगा लावल्या. त्यांचा व्यवसाय आता जोमात चालायला लागला आहे. आर्थिक संकटात असलेल्या आजोबांच्या चेहऱ्यावर आता हसू फुललं आहे. या आजी-आजोबांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.

View this post on Instagram

“I was 5 & Badami Ji was 3 when we got married in Azamgarh, UP. The only memory I have of the ceremony is of her hair in a braid; she looked like a doll. We thought we were attending a party–we wore new clothes, ate ladoos, performed rituals & went home. We had no idea we’d been married off; so when we met once a year, we’d reunite like old friends. As we grew older, the responsibilities of being ‘pati’ & ‘patni’ became clearer & at 21 Badami Ji came to live with me. Our friendship slipped into love–we’d grown up together & known each other our whole life. We’re luckier than most, but we knew we didn’t want our kids to have the same fate as us. So when I held our daughter for the first time, I decided to leave UP. We moved to Delhi in 1961. Here, I became a fruit seller. I’d get fruits from the mandi & Badami Ji would set up the stall. In the afternoons, Badami Ji would take over; she was a better saleswoman than me! As our family grew to 5, we began selling vegetables–we had our fair share of good & bad days. But we’d keep going for the times when we could afford chai & biscuit from a tapri. My favourite day is Friday though–that’s when Badami Ji makes aloo baingan! We then opened a chai stall. It took a toll on us financially, but Badami Ji had faith in me. I remember asking her, ‘Nahi chala toh?’ She smiled & said, ‘Koi baat nahi, kuch aur karengey!’ I wouldn’t have the courage to do anything without her. She may look small, but she has a strong willpower! So, in 1990, after hitting a half-century, we started Baba Ka Dhaba! Badami Ji does the chopping & I cook. There’s no ‘aadmi ka kaam’ or ‘aurat ka kaam’; 50-50 partners hain hum! But after lockdown, our business tanked; my older son also lost his job. We were barely scraping by–food was going to waste & we had no money to buy vegetables. Lekin waqt hain, badalta rehta hain–out of nowhere, a stranger came & took our video–the next day, we woke up to a line outside! Since then, all news people, company walas & customers have been coming & going. But when you were talking to Badami Ji just now, I overheard her saying, ‘Dekho iss umar mein bhi kitni mehnat karte hain!’Yeh toh best compliment hua na, madamji?"

A post shared by Humans of Bombay (@officialhumansofbombay) on

सुपरहिट आजोबांची सुपरहिट लव्हस्टोरी

'बाबा का ढाबा' मधल्या आजोबांची लव्हस्टोरी देखील सुपरहिट आहे बरं का. या आजोबांच्या पत्नीचं नाव बदामी आहे. कांतीप्रसाद आणि बदामी यांचा बालविवाह झाला होता. लग्नाच्या वेळी या आजोबांचं वय 5 वर्ष होतं तर आजी फक्त 3 वर्षाच्या होत्या. उत्तरप्रदेशातील आझमगड हे त्यांचं मुळ गाव. पुढे कामानिमित्त कांतीप्रसाद दिल्लीला स्थायिक झाले. दिल्लीला आल्यावर आजोबांनी फळं विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी चहाची टपरी टाकली. असे छोटे मोठे व्यवसाय करत 1990 साली आजोबांनी बाबा का ढाबा हे छोटसं दुकानं थाटलं. कांतीप्रसाद यांच्या प्रत्येक व्यवसायामध्ये बदामी आजींनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. अनेक वर्ष दोघांचा सुखाचा संसार सुरू आहे. कितीही कठीण प्रसंगामध्ये एकमेकांची सोबत सोडायची नाही, हा आजी-आजोबांचा निर्धार आजच्या तरुण पिढीनेही शिकण्यासारखा आहे. अशी आहे कांतीप्रसाद आणि बदामी यांची क्यूट लव्ह स्टोरी. या लव्हस्टोरीमध्ये व्हिलन नाही, नाट्यमय ट्विस्ट नाहीत. पण ही लव्हस्टोरी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 14, 2020, 4:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading