लखनऊ, 31 जुलै: कोरोना आणि वाढत्या महागाइसोबत आता नियम न पाळल्यास नागरिकांना मोठा दंड भरावा लागणार आहे. मोटर वाहन कायद्यांतर्गत आता नवीन दंडाचे नियम लागू करण्यात आले आहेत. मोबाईल चालवताना मोबाईलवर बोलत असल्यास 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार. हा आदेश 16 जूनच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयात घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशात कोरोना काळात आता आणखीन एक नियम कडक झाल्यानं नियम न पाळल्यास खिसा रिकामा होऊ शकतो. उत्तर प्रदेश मोटर वाहन कायद्यांतर्गत वाढीव दराचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कार आणि दुचाकीवरून जात असताना मोबाईलवर बोलत असाल तर पहिल्यांदा एक हजार आणि दुसऱ्यांदा पकडल्यास 10 हजाराचा दंड आकारण्यात येईल. विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांकडून एक हजाराचा दंड वसूल करण्यात येणार आहे.
हे वाचा- रक्ताच्या नात्येनं अंत्यसंस्काराला दिला नकार, सरपंचाने दिला माणूसकीचा आदर्श अपघाताचं प्रमाण टाळणं आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. विना हेल्मेट असणाऱ्यांना 1 हजार, सीट बेल्ट न लावणाऱ्यांनाही 1 हजार रुपयांची पावती फाडावी लागणार. विना लायसन्स गाडी चालवणाऱ्यांना किंवा 14 वर्षाहून कमी वय असणाऱ्यांनी गाडी चालवल्यास 5000 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशाचं पालन न करणाऱ्यांनाही 2 हजाराचा दंड आकारला जाईल. हा दंड सुरुवातील 1 हजार रुपये होता मात्र त्यात आणखीन हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.