जाहिरात
मराठी बातम्या / देश / दिल्लीहून आलेल्या प्रवाशांनी क्वारंटाईन व्हायला दिला नकार; कर्नाटक सरकारने चक्क रेल्वे बोगी जोडून उलटं परत पाठवलं

दिल्लीहून आलेल्या प्रवाशांनी क्वारंटाईन व्हायला दिला नकार; कर्नाटक सरकारने चक्क रेल्वे बोगी जोडून उलटं परत पाठवलं

दिल्लीहून आलेल्या प्रवाशांनी क्वारंटाईन व्हायला दिला नकार; कर्नाटक सरकारने चक्क रेल्वे बोगी जोडून उलटं परत पाठवलं

यावेळी प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ घातला आणि नो क्वारंटाईनच्या घोषणा दिल्या

  • -MIN READ
  • Last Updated :

रेवती राजीवन/ बंगळुरू, 14 मे : देशभरात विविध राज्यांमध्ये अडकलेल्यांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत अनेकांना आपल्या गावी सुखरुप पोहोचविण्यात आलं आहे. रेल्वेने प्रवास करताना कोरोनाचा फैलाव होऊ नये याबाबत काळजी घेतली जात आहे. आज दिल्ली ते केएसआर बंगळुरु रेल्वेतून 543 प्रवासी बंगळुरुला पोहोचले. यानंतर बंगळुरु सरकारने त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन राहण्याची सूचना केली. यापैकी 140 जणांनी क्वारंटाईनमध्ये राहण्यास नकार दिला. यावेळी प्रवाशांना बंगळुरु स्थानकावर मोठा गोंधळ घातला. यापैकी अनेकजण NO Quarantine च्या घोषणा देत होते. अनिवार्य क्वारंटाईन असल्याचे माहीत नसल्याचे यावेळी प्रवाशांनी सांगितले. यावेळी कर्नाटक सरकारचे अधिकारी आणि पोलीस, रेल्वे अधिकारी याच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी प्रवाशांची समजूत काढण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी इस्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यापैकी अनेकांनी क्वारंटाईनमध्ये राहण्यास नकार दिला. यापैकी 19 प्रवाशांनी तर पुन्हा दिल्लीला जाण्याची तयारी दर्शवली. यानंतर मात्र अधिक डबे जोडून त्यांना पुन्हा दिल्लीला पाठविण्यात आलं. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी ही संख्या वाढू नये यासाठी प्रवासानंतर क्वारंटाईन करणं आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. अन्यथा या आजारावर नियंत्रण आणणे कठीण जाऊ शकते. हे वाचा - #PGStory : सायकलच्या कॅरिअरला कोट अडकवून 2 वर्षांत 400 लग्नात जेवला रुममेट कोरोना चाचणीचे नियम बदलले; रुग्णांना घरी सोडण्याबाबत सरकारने घेतला नवा निर्णय

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात