मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोना चाचणीचे नियम बदलले; रुग्णांना घरी सोडण्याबाबत सरकारने घेतला नवा निर्णय

कोरोना चाचणीचे नियम बदलले; रुग्णांना घरी सोडण्याबाबत सरकारने घेतला नवा निर्णय

 मुंबई महापालिकेने राज्य शासन आणि केंद्र सरकारने दिलेल्या आदेशनुसार कोव्हिड-19 आजाराच्या तपासणीनंतर नवी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत.

मुंबई महापालिकेने राज्य शासन आणि केंद्र सरकारने दिलेल्या आदेशनुसार कोव्हिड-19 आजाराच्या तपासणीनंतर नवी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत.

मुंबई महापालिकेने राज्य शासन आणि केंद्र सरकारने दिलेल्या आदेशनुसार कोव्हिड-19 आजाराच्या तपासणीनंतर नवी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 14 मे : मुंबई महापालिकेने राज्य शासन आणि केंद्र सरकारने दिलेल्या आदेशनुसार कोव्हिड-19 आजाराच्या तपासणीनंतर नवी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. यानुसार कोरोना आणि इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. राज्यात सध्या कोरोनाचा हाहाकार माजला आहे. या सगळ्यात पालिकेडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. पालिकेने जारी केलेल्या निर्णयानुसार, आता सर्व गरोदर महिला ज्यांची बाळंतपणाची तारीख 5 दिवसाच्या जवपास आहेत यांची तपासणी करायची आहे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. नियमित डायलेसीस करावं लागणाऱ्या रुग्णांना आता दरवेळी टेस्ट करण्याची गरज नाही. पण अशा रुग्णांना लक्षणं असतील तर मात्र टेस्ट करून घेणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. लॉकडाऊनमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांचा कडक पवित्रा, 'सोमवारपासून एकही बस दिसणार नाही' टेस्ट करण्यासाठी सरकारी, महापालिकेचे आणि शासनाकडे नमूद असलेल्या खाजगी डॉक्टर यांचं प्रिक्रीप्शन असणं गरजेचं असेल. डॉक्टरांनी केवळ लक्षणं असलेल्या लोकांनाच टेस्ट करावयास सांगावं अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. विलागिकारान करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचे कुटुंबीय आणि जवळच्या संपर्कात आलेल्या लोकांचे 5 किंवा 14 व्या दिवशी एकदा टेस्ट करावे आणि या दिवसात लक्षणं आढळली नाहीतर त्यांना घरी सोडावं. राज्यपालांनी मॉडेलला मदत केल्याची बातमी खोटी, सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आज विक्रमी रुग्णांची नोंद झाली. संख्या वाढत असल्याने सरकार आणि राज्य हादरून गेलं आहे. आज राज्यात 1602 नवे रुग्ण सापडले. तर राज्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या आकड्यानं हजाराचा टप्पा ओलांडला आहे. रुग्णाची एकूण संख्या ही 27524 वर गेली आहे. आज राज्यात 44 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या 1019 वर गेली आहे. मुंबईत आज तब्बल 991 रुग्णांनी वाढ झाली. तर आज 512 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. मुंबईत आज 998 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनाच्या एकूण रुग्णाची संख्या 16579 वर पोहचली आहे. आज कोरोणामुळे 25लोकांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 621 जणाचा मृत्यू झाला आहे. आज 443जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 4234 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. धक्कादायक! शस्त्राने वार, मानेवर गोळ्या, चेहऱ्यावर अ‍सिड मग मृतदेह फेकला तलावात
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या