मराठी बातम्या /बातम्या /देश /

#PGStory : सायकलच्या कॅरिअरला कोट अडकवून लग्नांमध्ये जेवायला जायचा रुममेट, 400 वराती गाजवल्या

#PGStory : सायकलच्या कॅरिअरला कोट अडकवून लग्नांमध्ये जेवायला जायचा रुममेट, 400 वराती गाजवल्या

अनोळखी लग्नांमध्ये जाऊनही तो ज्या पद्धतीने वागायचा ते पाहून आमचे डोळे मोठे झाले.

अनोळखी लग्नांमध्ये जाऊनही तो ज्या पद्धतीने वागायचा ते पाहून आमचे डोळे मोठे झाले.

अनोळखी लग्नांमध्ये जाऊनही तो ज्या पद्धतीने वागायचा ते पाहून आमचे डोळे मोठे झाले.

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 14 मे : शिक्षण अथवा कामासाठी घराबाहेर एखाद्या पीजीमध्ये राहण्याचा अनुभव खूप भारी असतो. प्रत्येकाने एकदा तरी हा अनुभव घ्यावा असं म्हणतात. तो तुम्हाला अनुभवसंपन्न तर बनवतोच शिवाय ह्रदयाशी जोडणारी नाती मिळवून देतो. सध्या देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यानिमित्ताने हॉस्टेल वा पीजीमधील (#PGStory) आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न. ही कहाणी आहे शोभित कुमारची. शोभित उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील होता. दिल्ली विद्यापीठातून पीएचडी करीत होता. लाचपत नगरमध्ये एका भाड्याच्या घरात त्याने आपलं बस्तान मांडलं होतं. यादरम्यान पुस्तकांशी मैत्री करण्याबरोबरच त्याने खूप मजा-मस्ती केली. त्यापैकीच एक अत्यंत मजेशीर किस्सा त्याने शेअर केला आहे. हा त्यावेळेचा किस्सा आहे जेव्हा मी 12 वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बीएससी ऑनर्स करण्यासाठी दिल्ली विद्यापीठात दाखल झालो होता. चांगले गुण असल्याकारणाने माझा प्रवेश नक्की झाला होता. यामुळे बाबाही खूप खूष होते. त्यांनी मला तातडीने परवानगी दिली होती. माझ्या ओळखीच्यांपैकी अधिकतर मुले ग्रॅज्युएशन केल्यानंतर वडिलांसोबत शेती, मेडिकल स्टोअर किंवा तत्सम काम करीत होते. यामुळे गावातील सर्वांनाच माझा अभिमान वाटत होता. बाबा तर यामुळे खूप खूष होते. अशातच माझा दिल्लीला जाण्याचा दिवस आला. बाबा मला दिल्लीत हॉस्टेलमध्ये सोडण्यासाठीही आले होते. यानंतर मात्र एकट्याचा संघर्ष सुरू झाला होता. दिल्लीमध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी मला विद्यापीठातील मित्र-मैत्रिणींची खूप मदत मिळाली. अनिकेत, पंकज आणि आकांक्षा यांनी मदत खूप मदत केली. काही दिवसांनी मी हॉस्टेलमधून सौभाग्य आणि अनिकेतसह लाजपत नगरमधील एका भाड्याच्या रुममध्ये शिफ्ट झालो होतो. यामध्ये नियम ठरवून दिलेले होते. कोणी कधी स्वयंपाक करायचा..साफ सफाई आदी सर्व बाबी नेमून दिलेल्या होत्या. त्यातही सौभाग्य स्वयंपाक करण्यासाठी कधीच तयार नव्हता होत. तो म्हणायचा मी तर बाहेरुन खाऊन येतो मग मी का स्वयंपाक करायचा? त्याचं म्हणणं ही बरोबरच होतं. त्यामुळे मी आणि अनिकेत आम्ही दोघेच स्वयंपाक करत होतो. एक दिवस मी भाजी करत होतो आणि अनिकेत पोळ्या लाटत होता. गॅसजवळ उभं राहिल्याने दोघांचीही अवस्था वाईट झाली होती. अंगात घामाच्या धारा येत होत्या. तेवढ्यात सौभाग्य आला. म्हणाला, ‘मी तर जेवून आलोय. तुम्ही जेवा. आता अभ्यासाला पण बसायचं’. त्याला रोजच्या रोज बाहेर जेवायला कसं परवडतं, यामुळे आम्हाला त्याचा खूप हेवा वाटायचा. एकेदिवशी आम्ही दोघांनी त्याला घेरलं आणि दररोज बाहेर जेवणं कसं शक्य होतं, असं विचारलं. त्यानंतर तो जोरजोरात हसू लागला. दोघांनाही चांगल जेवू घालतो असं म्हणून तो आम्हाला बाहेर घेऊन गेला. एका लग्न कार्यालयापासून लांब आम्ही सायकल लावली. सायकलच्या कॅरिअरमधून मस्त असा लग्नाचा कोट बाहेर काढला. तो घातला आणि म्हणाला चला. त्याला बघून आम्ही जागीच स्थिर झालो. म्हणजे सौभाग्य दररोज लग्नांमध्ये जाऊन जेवत होता तर. तो आम्हाला जबरदस्तीने लग्नात घेऊन गेला. गेटवर लग्नाची काही मंडळी वेलकम करायला उभी होती. सौभाग्य त्यांच्या जवळ गेला आणि हातमिळवणी केली, लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आणि थेट आत शिरला. आम्ही त्याच्या मागून पटकन आत गेलो. 'बेगाना शादीमे अब्दुल्ला दीवाना' म्हणत आम्ही लग्नात खूप मजा केली. आठवड्याभरापासून उपाशी असल्यासारखं हादडलं. छोले, पनीर, सोयाचाप, काळी मसूरची डाळ, मूगाचा हलवा, गाजरचा हलवा, नूडल्य, चाट, पाणीपुरीपासून जे काही रांगेत दिसत होतं ते आम्ही ताटात घेत होतो. जर पकडले गेलो असतो तर काही खैर नव्हती. पोटभरून खाल्ल्यानंतर आम्ही थेट रुमवर आलो. आणि पोट धरून हसू लागलो. खाताना ह्रदयाचे ठोके जोरजोरात वाजत होते. पण ताटात चांगलं चुंगल खायला असल्यावर कसा कंट्रोल करणार. रुमवर आल्यावर त्याने जे काही सांगितलं त्यानंतर तर आम्ही गारचं झालो. गेल्या 2 वर्षात त्याने 400 हून अधिक लग्न आणि वाढदिवसाच्या पार्टीत जेवला आहे. आम्ही त्याला विचारलं की त्याला या लग्न वा कार्यक्रमांची माहिती कशी होते. यावर तो म्हणाला की तो एनडीएमसीच्या (New Delhi Municipal Council)  वेबसाइटवर रजिस्टर्ड केलेले सर्व प्रोग्रामचे डिटेल्स मिळवून कार्यक्रमात पोहोचतो. हे ऐकल्यानंतर आम्ही इतकं हसलो की आमचे गाल दुखायला लागले. एके दिवशी तर तो आपल्याही कॉलेजमधील शत्रूच्या भाच्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत गेलो होतो. त्या मुलांनी मला ओळखलं. त्यानंतर मात्र मागच्या पावलांनी मी सटकलो. आजही हा किस्सा आठवून आमचा पूर्ण ग्रूप त्याला खूप चिडवतो. संबंधित -कोरोनामुळे कामाच्या पद्धतीत बदल; मंत्रालयांकडून वर्क फ्रॉम होमचे गाइडलाइन्स
First published:

Tags: Corona virus in india

पुढील बातम्या