मराठी बातम्या /बातम्या /देश /सर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस; 'या' मंत्र्याची घोषणा, काय आहे प्रकरण?

सर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस; 'या' मंत्र्याची घोषणा, काय आहे प्रकरण?

मतदारसंघातील ज्या जोडप्याला जास्तीत जास्त अपत्य होतील (Parents With Highest Number Of Children) त्याला आम्ही एक लाख रुपयांचं बक्षीस देऊ असं रॉबर्ट यांनी जाहीर केलं आहे.

मतदारसंघातील ज्या जोडप्याला जास्तीत जास्त अपत्य होतील (Parents With Highest Number Of Children) त्याला आम्ही एक लाख रुपयांचं बक्षीस देऊ असं रॉबर्ट यांनी जाहीर केलं आहे.

मतदारसंघातील ज्या जोडप्याला जास्तीत जास्त अपत्य होतील (Parents With Highest Number Of Children) त्याला आम्ही एक लाख रुपयांचं बक्षीस देऊ असं रॉबर्ट यांनी जाहीर केलं आहे.

एजोल 22 जून: भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकवर आहे. पहिला क्रमांक चीनचा आहे. भारतात गेली काही दशकं ‘हम दो हमारे दो’ (Hum Do Hamare Do) हे धोरण पाळलं जात आहे. वेगवेगळ्या राज्यांचीही धोरणं आहेत. काही राज्यं लोकसंख्या नियंत्रणाचं धोरण राबवत आहेत. उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये लोकसंख्या नियंत्रणाचं धोरण राबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण मिझोरामच्या (Mizoram) क्रीडामंत्र्यांनी मात्र वेगळीच घोषणा केली आहे. मिझोरामचे क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमाविया रोयते यांनी आपल्या एजोल पूर्व 2 या विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी योजना जाहीर केली आहे. या मतदारसंघातील ज्या जोडप्याला जास्तीत जास्त अपत्य होतील (Parents With Highest Number Of Children) त्याला आम्ही एक लाख रुपयांचं बक्षीस देऊ असं रॉबर्ट यांनी जाहीर केलं आहे.

मिझो समुदायातील (Mizo Communities) लोकसंख्या वाढावी अशी या मागची इच्छा आहे. रॉबर्ट यांनी कमीतकमी अपत्यांची संख्या म्हणजे किती हे स्पष्ट केलेलं नाही. इतर राज्य लोकसंख्या नियंत्रणाची धोरणं राबवताना मंत्र्यानी हे आवाहन केलं आहे.

धमाकेदार ऑफर; केवळ 1 रुपयांत मिळवा ProBuds Earbuds, 25 तासांपर्यंत चालेल बॅटरी

गेल्या रविवारी आतंरराष्ट्रीय स्तरावर ‘फादर्स डे’ साजरा करण्यात आला. त्या दिवशी मंत्री रॉबर्ट यांनी जाहीर केलं की त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील ज्या दाम्पत्याला सर्वाधिक मुलं होतील त्याला एक लाख रुपये रोख, सर्टिफिकेट आणि एक ट्रॉफी दिली जाईल. कदाचित या बक्षिसाची रक्कम रॉबर्ट यांच्या मुलाची कन्स्ट्रक्शन कन्सल्टन्सी कंपनी देणार आहे. रॉबर्ट म्हणाले, ‘ मिझोराममध्ये अनेक आदिवासी जाती आहेत त्यातील मिझो जातीतील लोकसंख्या खूप कमी झाली आहे. ती इतकी कमी झाली आहे की त्याची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे ही योजना जाहीर केली आहे.’ अरुणाचल प्रदेशानंतर मिझोराममध्ये लोकसंख्येची घनता खूप कमी आहे.

भरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL

शेजारच्याच आसाममध्ये मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी दोन अपत्य असावी असंच धोरण जाहीर करणार असल्याचं सूचित केलं आहे. रविवारी उत्तर प्रदेशातल्या विधी आयोगाचे अध्यक्ष आदित्य नाथ मित्तल यांनी लोकसंख्येवर नियंत्रण करण्याचा विचार सरकार करत असल्याचं म्हटलं आहे.

मिझोराममध्ये लोकसंख्येची घनता कमी

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार मिझोराम राज्याची लोकसंख्या 1,091,014 आणि क्षेत्रफळ साधारणपणे 21,087 चौरस किलोमीटर आहे. अरुणाचल प्रदेशानंतर मिझोराममध्ये लोकसंख्येची घनता सर्वांत कमी आहे. याबाबतीत मिझोरामचा दुसरा क्रमांक लागतो. इथं प्रति चौरस किलोमीटरमध्ये 52 माणसं राहतात तर अरुणाचल प्रदेशात हे प्रमाण 17 इतकं कमी आहे. राष्ट्रीय सरासरी 382 प्रति चौरस किलोमीटर आहे.

First published:

Tags: Elderly population, India, Parents and child, Viral