पन्ना, 5 मे : हिरा नगरी या नावानं प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यात एक मजूर डोळ्याची पापणी लवते न लवते तोच लखपती झाला आहे. झारकुआ गावातील रहिवासी प्रताप सिंह यादव यांना बुधवारी खाणीत एक मौल्यवान तेजस्वी हिरा सापडला आहे. त्यांना कृष्णा कल्याणपूरच्या उथळ खाणीत 11.88 कॅरेटचा हिरा सापडला आहे. त्याची अंदाजे किंमत 60 ते 70 लाख रुपये आहे.
प्रताप सिंह यादव हे पन्ना जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 30 किमी अंतरावर असलेल्या झारकुआ गावचे रहिवासी आहेत. शेती आणि मजुरी करून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. काही काळापूर्वी त्यांनी कृष्णा कल्याणपूर पट्टी येथे खाणकाम करण्याची मान्यता घेतली. कडक उन्हात काबाडकष्ट करून त्यांनी हिऱ्याचा शोध घेतला. अखेर बुधवारी त्यांचं नशीब चमकलं. हिरा घेऊन ते ऑफिसला पोहोचले. जिथे त्यांनी हा हिरा जमा केला आहे. आता पुढे या हिऱ्यातून मजुराला काय मिळेल आणि कसं मिळेल, हे जाणून घेऊ.
तेजस्वी/उज्ज्वल हिरा म्हणजे काय?
हिरे तीन प्रकारचे असतात. पहिला - उज्ज्वल / जेम, दुसरा - मैलो आणि तिसरा - मटठो. जेम दर्जाच्या हिऱ्यांना सर्वाधिक किंमत मिळते. तो पूर्णपणे पांढरा असतो. सुरतच्या सराफा बाजारात एका कॅरेटच्या हिऱ्याची सरासरी किंमत 8 लाख रुपये आहे, जी शुद्ध प्रमाणात आहे. पन्ना जिल्ह्याच्या लिलावात सरासरी चार लाख रुपयांची बोली लावली जाते. कारण तो पूर्णपणे शुद्ध नसतो. मेलो म्हणजे तपकिरी आणि मटठो म्हणजे काळा.
सुमारे 50 लाख रुपये मिळतील
मजूर प्रताप यांनाही उज्ज्वल प्रकारचा हिरा मिळाला आहे. आता हा हिरा आगामी लिलावात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर, लिलावात मिळालेल्या रकमेपैकी 12 टक्के सरकारी महसूल आणि 1 टक्के कर वजा करून उर्वरित रक्कम प्रताप सिंह यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. या हिऱ्याचा 60 ते 70 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत लिलाव झाल्यास त्यांना सुमारे 50 लाख रुपये मिळतील, असं मानलं जात आहे.
मुलांना चांगल्या शाळेत शिकवणार
हिरा मिळालेले प्रताप सिंह यादव सांगतात की, भगवान जुगल किशोरजींच्या कृपेने त्यांना हा हिरा मिळाला आहे. आता त्यांच्या कुटुंबाची स्थिती सुधारेल. काही व्यवसाय करणार आहे. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी चांगल्या शाळेत शिकवू.
सरकारी जमीन भाडेपट्ट्याने मिळण्याची प्रक्रिया
पन्नामध्ये सरकारी जमीन भाडेपट्ट्याने घेण्यासाठी अर्ज भरावा लागतो. हीरा कार्यालयातील लिपिक सुनील कुमार जाटव म्हणाले, अर्जासोबत तीन छायाचित्रं, आधार कार्डाची प्रत आणि 200 रुपयांचं बँक चलन पन्ना येथील एसबीआय शाखेत जमा करावं लागतं. चलनाची प्रतही कार्यालयात जमा करावी लागेल. यानंतर, 20 दिवसांच्या आत भाडेपट्टी मिळते.
हे वाचा -
सॅल्यूट..!स्तनपान देऊन दोन महिला कॉन्स्टेबल बनल्या अडीच महिन्यांच्या बाळाच्या आई
खासगी जमीन भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया
खासगी जमिनीत हिऱ्याची खाण चालवण्यासाठी जमीन मालकाकडून संमतीपत्र आणि करारपत्र, विक्री करार, भाडेपत्र आवश्यक आहे. 3 छायाचित्रं, आधार कार्डाची कॉपी, 200 रुपयांचे चलन जमा केल्यानंतर पट्टा जारी केला जातो. खासगी खाणी कुठेही चालवता येतात. परंतु, तो भाग हिरे उत्खनन क्षेत्राच्या नकाशात असला पाहिजे.
असा हिरा निघतो
फॉर्म प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हिरे कार्यालय 8 बाय 8 मीटरचा भाडेपट्टा देते. यानंतर ठेकेदार स्वत: किंवा मजूर लावून हिरा शोधू शकतो. हीरा पट्टी खाणीत तैनात असलेले सिद्धीलाल हवालदार म्हणाले की, माती बाहेर काढून फेकली जाते. खडकाळ माती पाण्यात धुतली जाते. नंतर ती वाळवली जाते आणि फिल्टर केली जाते. त्यातून हिरे निघतात. हा नशिबाचा आणि मेहनतीचा खेळ आहे.
हे वाचा -
कोरोनाने घेतला मुलाचा बळी, विधवा सुनेसाठी सासू-सासऱ्यांनी केलं असं काही
12% महसुल वजा केल्यानंतर ठेकेदाराचे उरलेले पैसे
हिरा मिळाल्यावर तो हिरा कार्यालयात जमा करावा लागतो. तेथून लिलावाची प्रक्रिया होते, ज्यामध्ये देशातील मोठे उद्योगपती सहभागी होतात. ते किंमत लावतात. निश्चित केलेल्या किमतीतून सरकार 12% महसूल कापते. उर्वरित रक्कम हिरा शोधणाऱ्याला दिली जाते. कपात केली जाणारी रक्कम 11% रॉयल्टी आणि 1% TDS असते. लिलाव प्रक्रिया दर तीन महिन्यांतून एकदा आणि वर्षातून चार वेळा केली जाते. याची वर्तमानपत्रात जाहिरात दिली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.