राजस्थान, 05 मे: राजस्थानमधील (Rajasthan) कोटा विभागातील बारन (Baran) जिल्ह्यात पोलिसांचं एक आगळळंवेगळं रूप बघायला मिळालं आहे. येथील सारथल पोलीस स्टेशनच्या हद्दीत भूक (Hunger) आणि तहानेनं (Thirst) व्याकूळ झालेल्या एका अडीच महिन्यांच्या निष्पाप आदिवासी मुलीला (Tribal Baby Girl) बघून प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याचं हृदय पिळवटून निघालं होतं. या मुलीची अवस्था पाहून पोलीस स्टेशनमधील दोन महिला कॉन्स्टेबलनी (Female Constable) तिला स्वत:चं दूध पाजून (Breastfeeding) माणुसकीचा (Humanity) नवा अध्याय लिहिला आहे. ही मुलगी दारूच्या नशेत असलेल्या वडिलांजवळ जंगलात सापडली होती. पोलिसांनी मुलीच्या आईचा शोध घेऊन तिला आईच्या हवाली केलं आहे. मुलीचे प्राण वाचवणाऱ्या लेडी कॉन्स्टेबलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पोलीस अधिकारी महावीर किराड यांनी सांगितलं की, अडीच महिन्यांच्या निष्पाप मुलीसाठी पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या दोन्ही महिला कॉन्स्टेबलनी माता यशोदेची (Yashoda) भूमिका बजावून तिचे प्राण वाचवले. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बाबड येथील डोंगराळ जंगलातून 4 मे रोजी दुपारी एक 30 वर्षीय व्यक्ती मद्यधुंद (Drunk) अवस्थेत फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्या व्यक्तीकडे एक लहान बाळ (Child) असल्याचंही पोलिसांना समजलं होतं. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. एक व्यक्ती झुडपात पडल्याचं निदर्शनास आलं. इतकच नाहीतर ती व्यक्ती दारूच्या नशेत होती आणि तिच्याकडे उष्णतेमुळं बेशुद्ध (Unconscious) अवस्थेत असलेली एक अडीच महिन्यांची होती. महिला कॉन्स्टेबल मुकलेश यांनी मुलीला पाहताक्षणी आपल्या छत्रछायेत घेतलं.
दोन महिला कॉन्स्टेबलनं पाजलं दूध
नशेत असलेल्या व्यक्तीला मुलीसह पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं. मुलीची गंभीर अवस्था पाहून महिला कॉन्स्टेबल मुकलेश (Muklesh) आणि पूजा (Pooja) यांनी तिला आपलं स्वत:चं दूध पाजून तिची भूक भागवली. मुकलेश आणि पूजा यांना स्वत:ची लहान मुलं आहेत. त्यामुळे आई असण्याच्या जाणीवेनं त्यांना मुलीची काळजी घेण्यास भाग पाडलं. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता तो त्या मुलीचा बाप असल्याचं निष्पन्न झालं. राधेश्याम काथोडी असं त्याचं नाव आहे. तो छिपाबाडोद पोलीस स्टेशन हद्दीतील सालापुरा येथील रहिवासी आहे.
आईचा तपास लागेपर्यंत महिला कॉन्स्टेबलनी घेतली मुलीची काळजी
राधेश्याम हा पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास झालावाड जिल्ह्यातील कामखेडा परिसरातील बंधा या आपल्या सासरवाडीतून मुलीला गुपचूप घेऊन निघाला होता. भुकेनं व्याकुळ झालेल्या मुलीला घेऊन तो दारूच्या नशेत 15 किमी अंतरावरील सालापुरा येथे जात असल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या आईशी (Mother) संपर्क साधला. तोपर्यंत कॉन्स्टेबल मुकलेश आणि पूजा यांनी मुलीची पूर्ण काळजी घेतली. दोघींनी तिला आलटून-पालटून स्वत:चं दूध पाजलं.
मुलीचे ओठ कोरडे पडले होते
महिला कॉन्स्टेबल मुकलेश आणि पूजा यांनी सांगितलं की, 'मुलीची स्थिती पाहून ती अनेक तासांपासून उपाशी असल्याचं दिसत होतं. तिचे ओठ कोरडे (Dry) पडले होते. एवढ्या लहान मुलीला वरचं अन्न देऊ शकत नाही. आम्हा दोघींनाही एक वर्षाची मुलं आहेत. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता आम्ही मुलीला दूध पाजलं.' एका अनोळखी आदिवासी मुलीला आमचं दूध पाजता आलं ही देवाची कृपा आहे, असंही मुकलेश आणि पूजा म्हणाल्या.
कॉन्स्टेबल मुकलेश आणि पूजा यांनी दाखवलेल्या दयेमुळं आजही माणुसकी जिवंत असल्याचं दिसतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajstan