जाहिरात
मराठी बातम्या / देश / पाकचा खतरनाक प्लॅन उघड, 14 सुंदर मुलींची यादी समोर; पोलिसांकडून अलर्ट जारी

पाकचा खतरनाक प्लॅन उघड, 14 सुंदर मुलींची यादी समोर; पोलिसांकडून अलर्ट जारी

या 'हनीट्रॅप'मध्ये अडकू नका!

या 'हनीट्रॅप'मध्ये अडकू नका!

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने फेसबुक, व्हॉट्सऍप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, लिंक्डइनवर अनेक बनावट प्रोफाइल बनवल्या असून 14 सुंदर मुलींचे फोटो वापरून भारतीयांना अडकवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सावध राहा.

  • -MIN READ Local18 Lucknow,Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 30 जून : भारताच्या सीमाभागात पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कुरघोड्या सुरूच असतात. भारतीय जवान मात्र त्यांचा जम बसू देत नाहीत. त्यांनी डोकं वर काढताच त्यांचा खात्मा केला जातो. त्यामुळे आपण आपापल्या घरी शांत झोपू शकतो. परंतु आता मात्र पाकिस्तान सायबर हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या गुप्तचर विभागाला मिळाली आहे. ‘पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या नव्या प्लॅनपासून सावध राहा, यावेळी त्यांच्या रडारवर भारतीय लष्कर, निमलष्करी दल, राज्य पोलीस अधिकारी आणि शास्त्रज्ञ आहेत’, अशी माहिती गुप्तचर विभागाकडून राज्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना देण्यात आली आहे. ‘पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने फेसबुक, व्हॉट्सऍप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, लिंक्डइनवर अनेक बनावट प्रोफाइल बनवल्या असून 14 सुंदर मुलींचे फोटो वापरून भारतीयांना अडकवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सावध राहा, या हनीट्रॅपमध्ये अडकू नका’, असे आदेश देऊन गुप्तचर विभागाने सर्व बनावट प्रोफाइल्स जारी केल्या आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने सोशल मीडियावर सुंदर-सुंदर मुलींचे फोटो आणि भारतीय मोबाईल क्रमांक वापरून भारतीय मुलींच्या नावे प्रोफाइल्स तयार केल्या आहेत. यातील प्रत्येक प्रोफाइल अशी आहे की जी पाहताच कोणीही ती चालवणाऱ्याच्या प्रेमात पडेल. यांवर पोस्ट केले जाणारे फोटोही असे असतात की, ज्यांच्या पार्श्वभागावरून ते नेमके कुठे काढलेत याचा थांगपत्ता लागत नाही. शिवाय या प्रत्येक प्रोफाइलच्या फ्रेंड लिस्टमध्ये बहुतांशी लष्करातील लोक आणि पोलीस दिसतात. Bigg Boss OTT 2 मध्ये हद्दच झाली! स्पर्धकांनी सगळ्यांसमोरच एकेमेकांना केलं लिपलॉक किस गुप्तचर विभागाने 26 जून रोजी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात या सर्व प्रोफाइलच्या लिंक आणि त्या ज्या क्रमांकावरून बनवल्या आहेत ते मोबाईल क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर यामध्ये पोलीस दलातील सर्वांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंट्सचा या प्रोफाइल्सशी काहीही संबंध नाही, याची खात्री करून घेणासही सांगितलं आहे. या पत्रानंतर उत्तर प्रदेशातील सर्व पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात