जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss OTT 2 मध्ये हद्दच झाली! स्पर्धकांचं ते लिपलॉक किस पाहून भडकले प्रेक्षक; म्हणाले...

Bigg Boss OTT 2 मध्ये हद्दच झाली! स्पर्धकांचं ते लिपलॉक किस पाहून भडकले प्रेक्षक; म्हणाले...

बिग बॉस ओटीटी 2

बिग बॉस ओटीटी 2

सलमान खानने दावा केला होता की ‘बिग बॉस ओटीटी 2’ हा एक फॅमिली शो असणार आहे. पण आता शो मध्ये कॅमेऱ्यासमोर असं काही घडलं की ते पाहून सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 जून : बिग बॉस हा वादग्रस्त कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ‘बिग बॉस ओटीटी 2’ हा शो नुकतंच जिओ सिनेमावर पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या या शोला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. पण याविषयी एक विशेष गोष्ट म्हणजे हा शो सेन्सॉर्ड नाही. या शोमध्ये जे घडेल त्यावर काही मर्यादा नाहीत. पण याविषयी भाईजान  प्रीमियरच्या एपिसोडमध्येच ‘सर्व स्पर्धकांनी आपापल्या सभ्यतेची काळजी घ्यावी.’ असं म्हणाला होता. पण आता या सर्व मर्यादा टाळून या शो मध्ये असं काही घडलं आहे की बिग बॉसच्या इतिहासात असं घडण्याची ही पहिलीच वेळ आहे. सलमान खानने दावा केला होता की  ‘बिग बॉस ओटीटी 2’ हा एक फॅमिली शो असणार आहे. पण आता शो मध्ये कॅमेऱ्यासमोर असं काही घडलं की ते पाहून सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. तर झालं असं की, शोमधील स्पर्धक जेडी हदीद आणि आकांक्षा पुरी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये चक्क एकमेकांना किस केलं.

News18लोकमत
News18लोकमत

बिग बॉस OTT 2 तुन आजवर तीन स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले आहे. पण या सगळ्यामध्ये जेडी हदीदची जोरदार चर्चा आहे. दुबईस्थित मॉडेल जेडी हदीद ‘बिग बॉस ओटीटी 2’ मधील स्पर्धक आहे. जेडी हदीदने आकांक्षा पुरीसोबत सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जेडी हदीदने आकांक्षा पुरीला 30 सेकंद किस केलं. खरंतर त्याला अविनाश सचदेव यांनी या किससाठी आव्हान दिलं होतं. मग काय, आकांक्षा आणि जेडीने एकमेकांना मिठीत घेतलं आणि फ्रेंच किस केलं. कॅमेऱ्यासमोर केलेलं हे किस तब्बल  30 सेकंदांचं होतं, जे पाहून घरातील सदस्य देखील अवाक् झाले. Kajol : ‘ती गोष्ट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग….’ स्त्रीसुखाविषयी स्पष्टच बोलली काजोल बिग बॉसच्या घरात घडलेल्या या घटनेमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. काहींनी त्याची खिल्ली उडवली, तर काहीजण थोडे नाराज झाले. हा क्षण थेट कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर जेड ट्विटरवर ट्रेंड करत आहे तर भाईजान प्रचंड ट्रोल झाला आहे.

जाहिरात

जेडीला पहिल्या दिवसापासून आकांक्षा आवडते.  याच गोष्टीवरून आता जेडी हदीद आणि आकांक्षा पुरी या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची माहिती आहे. पण जेडीचं आधीच लग्न झालेलं असून त्याला एक मुलगी देखील आहे. असं असुन सुद्धा जेडीने शोमध्ये आकांक्षाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इतकेच नाही तर आकांक्षा आणि जेडी बिग बॉसच्या घरात एकमेकांसोबत बराच वेळ घालवताना आणि गप्पा मारताना दिसत आहेत. त्यामुळे या दोघांच्या नात्याला वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे. आता वीकेंड का वारला सलमान खान कधी येतो आणि तो या दोघांना काय सल्ला देतो याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. शोच्या सुरुवातीला त्याने दावा केला होता की हा एक फॅमिली शो आहे, आता त्याच्या दाव्यांचा पर्दाफाश झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात