जाहिरात
मराठी बातम्या / देश / ट्विन टॉवर्स कोसळल्याने परिसर भूकंपासारखा हादरणार? लोकांना किती धोका? प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

ट्विन टॉवर्स कोसळल्याने परिसर भूकंपासारखा हादरणार? लोकांना किती धोका? प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

ट्विन टॉवर्स कोसळल्याने परिसर भूकंपासारखा हादरणार? लोकांना किती धोका? प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Supertech Twin Tower Demolition: नोएडा सेक्टर 93A मधील जवळपास 32 मजली ट्विन टॉवर पाडण्यासाठी 3,600 किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा वापर केला जाईल. उद्या म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास हे ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहेत. या भागात 31 ऑगस्टपर्यंत ड्रोनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नोएडा, 27 ऑगस्ट : नोएडामध्ये भ्रष्टाचारामुळे उभा राहिलेला सुपरटेक ट्विन टॉवर पाडण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. उद्या म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता ही गगनचुंबी इमारत स्फोटाने उडवून दिली जाईल. अशा स्थितीत 28 मजली आणि 32 मजली ट्विन टॉवर जमिनदोस्त होताना स्फोट किती वेगाने होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. तसेच, जमीनीवरील हादरे किती वेगवान असेल आणि आजूबाजूचे लोक सुरक्षित असतील का? अशा परिस्थितीत न्यूज18 ने इमारत पाडणारी कंपनी एडफिस अभियांत्रिकीचे तज्ज्ञ मयूर मेहता यांच्याशी संवाद साधला. त्यांनी आतापर्यंत केलेल्या स्ट्रक्चर अभ्यासाची माहिती दिली. 25 मिलीमीटर प्रति सेकंद कंपनाचा अंदाज अभियंता मयूर मेहता यांच्या म्हणण्यानुसार ट्विन टॉवर एक 32 मजली आणि दुसरा 28 मजली आहे. अशा स्थितीत टॉवरमध्ये स्फोट झाल्यानंतर होणारे कंपन आणि त्यानंतर तो कोसळण्याबाबत तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात आला आहे. यासाठी अनेक संस्थांच्या तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला. इमारतीच्या संरचनेनुसार, टॉवर कोसळल्यावर 25 मिमी प्रति सेकंद कंपन अपेक्षित आहे. त्याचबरोबर नेमका कंपन टॉवर कोसळल्यानंतर स्वयंचलित मॉनिटरिंग मशिनवरूनच कळेल, त्यासाठी मशीन्स बसवण्यात आल्या आहेत. नोएडामध्ये भूकंपामुळे सरासरी कंपन किती होते? अभियंता मयूर मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडामध्ये आतापर्यंत झालेल्या भूकंपाचे मूल्यांकन करण्यात आले आहे. येथे सहसा 4 ते 5 स्केलचा भूकंप होतो. त्याचे कंपन 300 ते 400 मिमी प्रति सेकंद आहे. इथल्या इमारती इतक्या कंपनापासून सुरक्षित होत्या. अशा परिस्थितीत, जेव्हा ट्विन टॉवर कोसळेल, तेव्हा नोएडामधील बहुतेक कंपन 12 ते 16 पट कमी अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. PHOTO : नोएडातील ट्वीन टॉवर स्फोटाने नाही तर इम्प्लोजन पद्धतीने पाडणार! CBRI ने ग्रीन सिग्नल दिला सेंट्रल बिल्डिंग रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (CBRI), रुरकी येथील तज्ज्ञांनीही टॉवरची पाहणी केली. आजूबाजूच्या परिसरातील इमारतींचेही निरिक्षण केले. त्यानंतरच 28 ऑगस्ट रोजी ट्विन टॉवर पाडण्यास हिरवा झेंडा देण्यात आला. CBRI ने स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट, स्ट्रक्चरल अॅनालिसिस आणि सुपरटेक एमराल्ड कोर्ट आणि ATS व्हिलेज सोसायटीशी संबंधित क्रॅक गेजची स्थापना करण्यासही सहमती दर्शवली. त्याचबरोबर एमराल्ड कोर्ट सोसायटीमध्ये सुरू असलेल्या 50 खांबांच्या दुरुस्तीचे काम आज पूर्ण होणार आहे. दोन सोसायट्यांमधील वीज आणि गॅस पाइपलाइन तोडण्यात येणार ट्विन टॉवर्सच्या शेजारील एटीएस व्हिलेज आणि सुपरटेक एमराल्ड कोर्ट सोसायटीमध्ये 28 ऑगस्ट रोजी वीज आणि गॅस कनेक्शन कापले जातील. तसेच दोन्ही सोसायट्यांचे फ्लॅट सकाळी 7 वाजेपर्यंत रिकामे होतील. सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे 1500 कुटुंबांची वीज आणि गॅस कनेक्शन ठप्प राहणार आहे. येथील इमारती 7.5 ते 8 स्केलच्या भूकंपांना तोंड देऊ शकतात तज्ज्ञांच्या मते नोएडामध्ये 6 वर्षांपूर्वी भूकंपाची सर्वाधिक तीव्रता मोजण्यात आली होती. हा भूकंप 6.8 स्केलचा होता. याशिवाय नोएडातील बहुतांश भूकंपांचे प्रमाण 4 ते 5 इतके होते. त्याच वेळी, येथील नवीन निवासी इमारतींची भूकंप प्रतिरोधक क्षमता कमाल 7.5 किंवा 8.0 स्केलपर्यंत आहे. परंतु, सर्व जुन्या इमारती कमकुवत असून त्यामध्ये भूकंपाचा धोका अधिक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात