वडिलांच्या मृत्यूनंतर एकही सुट्टी घेतली नाही, कोरोनाबाधितासांठी झटणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

वडिलांच्या मृत्यूनंतर एकही सुट्टी घेतली नाही, कोरोनाबाधितासांठी झटणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

कटकचे जिल्हाधिकारी भवानी शंकर चैनी (Bhabani Shankar Chayani) यांचे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ट्वीट करून प्रशंसा केली आहे.

  • Share this:

कटक (ओडिसा), 09 एप्रिल : कटकचे जिल्हाधिकारी भवानी शंकर चैनी (Bhabani Shankar Chayani) यांचे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ट्वीट करून प्रशंसा केली आहे. कारणही तसंच आहे. देशभरात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अशावेळी सर्व सरकारी यंत्रणा जोमाने कामं करत आहे. मात्र याच दरम्यान भवानी शंकर यांचे वडिल आणि माजी अधिकारी दामोदर चैनी (98) यांचे मंगळवारी निधन झाले. आणि त्यावेळी त्यांचा मुलगा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी काम करत होता.

(हे वाचा-कोरोना: भारताच्या Hydroxychloroquine औषधाला जगभरात मागणी, त्याचं हे आहे कारण)

कोव्हिड 19 (COVID-19) बाबत बोलताना राज्य सरकारचे प्रवक्ते सुब्रतो बागची यांनी कटकच्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रशंसा केली. त्यांनी घरातील दु:ख बाजूला ठेवून सेवा सुरू ठेवली म्हणून त्यांचं सरकारकडून कौतुक करण्यात येत आहे. यावेळी बागची यांनी भवानी शंकर यांनी दिलेली प्रतिक्रिया सांगितली. भवानी शंकर चैनी यांचे वडील त्यांना म्हणायचे की,'कोणतही अर्धवट केलेलं काम हे काम नसतं.' वडिलांंच्या शब्दांमुळेच काम करण्याची ताकद मिळाली असं मत चैनी यांचंं आहे. त्यांची ही प्रतिक्रिया बागची यांनी सर्वांसमोर सांगितली.

(हे वाचा-5 मिनिटं उभं राहून मोदींना मानवंदना देण्यावर पंतप्रधानांनी स्वतः केला खुलासा)

त्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. त्यांनी यावेळी चैनी यांच्या कामालाही दाद दिली. 'अशा नेतृत्वाला ओडिशा सलाम करते आहे', असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

ओडिशामध्ये सध्या 42 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे तर 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

संपादन- जान्हवी भाटकर

First published: April 9, 2020, 2:45 PM IST
Tags: corona

ताज्या बातम्या