कोरोना विरुद्ध भारताच्या Hydroxychloroquine या औषधाला जगभरात मागणी, त्याचं हे आहे कारण

जगात भारत या औषधाचा मोठा उत्पादक देश आहे. त्यामुळे अमेरिकेसह अनेक देशांकडून या औषधाची मागणी वाढते आहे.

जगात भारत या औषधाचा मोठा उत्पादक देश आहे. त्यामुळे अमेरिकेसह अनेक देशांकडून या औषधाची मागणी वाढते आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 08 एप्रिल : कोरोनावर जगभर संशोधन सुरू आहे. मात्र त्यावर अजुनही ठोस औषध मिळालेलं नाही. साथीच्या काही आजारांवर जी औषधं दिली जातात त्याचाच वापर कोरोनाविरुद्ध केला जात आहे. यात आघाडीवर आहे ते Hydroxychloroquine हे औषध. मलेरियासाठी त्याचा वापर केला जातो. जगात भारत या औषधाचा मोठा उत्पादक देश आहे. त्यामुळे अमेरिकेसह अनेक देशांकडून या औषधाची मागणी वाढते आहे. भारतात मलेरिया निर्मुलनासाठी Hydroxychloroquineचा वापर केला जातो. चटकन होणारी उपलब्धता आणि कमी किंमत यामुळे हे औषध मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. भारतात मेलेरियावर नियमंत्रण मिळविण्यासाठी या औषधाचा वाटा मोठा आहे. कोरोना रुग्णांसाठी हे औषध वापरणं काही प्रमाणात उपयुक्त ठरत आहे. या औषधामुळे व्हायरसचं इन्फेक्शन कमी होते असं आढळून आलं आहे. इन्फेक्शन रोखलं गेलं की प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अमेरिका, ब्राझीलसह अनेक देश या औषधाची भारताकडे मागणी करत आहेत. भारताकडे या औषधाचा साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, इतर देशांकडून याची मागणी वाढत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने हे औषध निर्यात केल्यानंतर मोदींचं कौतुक केलं होतं. आता ब्राझीलच्या पंतप्रधानांनी हुनमान जयंतीचे औचित्य साधत मोदी हनुमान असून, त्यांनी जगाला संजीवनी बुटी दिली आहे, असे वर्णन केले आहे. हे वाचा-  कोरोनाचा वेग थांबेना, गेल्या 24 तासांमध्ये 773 नवे रुग्ण, 32 जणांचा मृत्यू ब्राझीलचे पंतप्रधान जैअर बोल्सनारो यांनी मोदींचे पत्राद्वारे कौतुक केले आहे. त्यांनी, "संजीवनी बूटी आणून हनुमानजींनी भगवान रामाचे बंधू लक्ष्मण यांचे प्राण वाचवले, त्याचप्रमाणे भारताने दिलेली औषधी लोकांचे जीवन वाचवेल", असे सांगितले. तसेच, भारत आणि ब्राझील एकत्र या आपत्तीचा सामना करण्यास सक्षम असतील. कोरोना संसर्गाच्या उपचारात फायदेशीर असलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनला अमेरिकेसह जगभरातून मागणी आहे.

   हे वाचा-  VIDEO : कोरोनाशी लढणाऱ्या नर्स आणि तिच्या मुलीचे अश्रू पाहून डोळ्यात येईल पाणी

  डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलून कोरोनाशी लढण्यासाठी सहकार्याची मागणी केली होती. अमेरिकेने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताकडून 29 लाख डोस हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन खरेदी केले आहेत. सुरुवातीला भारताने या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती पण आता त्याला पुन्हा अटींसह परवानगी देण्यात आली आहे.

   हे वाचा-  केंद्रीय मंत्र्याचं अख्खं कुटुंब शिवतंय कोरोना योद्ध्यांसाठी सुरक्षा मास्क

  भारताने औषधांच्या पुरवठ्यास मान्यता दिली आहे भारताने 14 औषधांच्या निर्यातीवरील बंदी हटवली. पॅरासिटामॉल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध परवाना श्रेणीमध्येच आहेत. मात्र त्यांच्या मागणीवर सतत नजर ठेवले जाईल. परंतु मागणीनुसार पुरवठा होत असल्यास काही प्रमाणात निर्यात करण्यास परवानगी दिली जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले की, कोरोनाव्हायरस साथीच्या वेळी भारताने नेहमीच असे म्हटले आहे की अशा कठीण परिस्थितीत संपूर्ण जगाला एकत्र लढावे लागेल. तसेच माणुसकीबाबत देखील विचार करावा लागेल. या रोगाचा सर्वाधिक त्रास असलेल्या गरजू देशांना ही औषधे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. (संपादन - अजय कौटिकवार)    
  First published: