Home /News /national /

या लढवय्यांना सलाम! 250 किमी प्रवास करून रुग्णसेवा करण्यासाठी पोहोचली 8 महिन्यांची गर्भवती नर्स

या लढवय्यांना सलाम! 250 किमी प्रवास करून रुग्णसेवा करण्यासाठी पोहोचली 8 महिन्यांची गर्भवती नर्स

आज देशामध्ये खरी लढाई लढत आहेत, ते म्हणजे डॉक्टर, सफाई कामगार, पोलीस अधिकारी आणि कोरोनाला हरवण्यासाठी अत्यावश्यक कामं करणारा प्रत्येक कर्मचारी. देशभरातून या 'कोरोना कमांडो'ची प्रशंसा केली जात आहे.

    नवी दिल्ली, 05 एप्रिल : आज देशामध्ये खरी लढाई लढत आहेत, ते म्हणजे डॉक्टर, सफाई कामगार, पोलीस अधिकारी आणि कोरोनाला हरवण्यासाठी अत्यावश्यक कामं करणारा प्रत्येक कर्मचारी. देशभरातून या 'कोरोना कमांडो'ची प्रशंसा केली जात आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) दिवंसेदिवस रौद्ररुप धारण करत आहे. अशा परिस्थितीत हे 'हिरो'च आपल्याला वाचवू शकतात, असा विश्वास देणाऱ्या घटना वारंवार आजुबाजुला घडत आहेत. 8 महिन्यांची  गर्भवती नर्स मदतीसाठी पोहोचली 250 किमी लांब असणाऱ्या दवाखान्यात तामिळनाडूमधील ही घटना आहे. विनोथिनी या पेशाने नर्स असणाऱ्या 8 महिन्यांच्या गर्भवती आहेत. त्या कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी तिरुचिरापासून रामनाथपूरमपर्यंत 250 किमीचा प्रवास करून पोहोचल्या आहेत. त्याठिकाणी त्या आपली सेवा नेटाने पार पाडत आहेत. 25 वर्षांच्या विनोथिनी त्रिचीमध्ये एका खाजगी दवाखान्यात नर्स आहेत, पण सध्याची परिस्थिती पाहता त्यांना कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी ड्यूटी लावण्यात आली. (हे वाचा-Coronavirus झाला अधिकच भयंकर, आता मेंदूवरही करतोय हल्ला) वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या गर्भवती असल्याचं कळताच त्यांनी विनोथिनींचं नाव या कामातून वगळल. तर विनोथिनी यांनी त्या अधिकाऱ्यांना मनवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, पण त्यांनी त्यांचं ऐकलं नाही. त्यानंतर त्यांनी स्थानिक मंत्र्यांच्या मदतीने लॉकडाऊनमध्ये बाहेर पडण्यासाठी विशेष पास बनवून घेतला आणि त्यांनी पतीच्या मदतीने प्रायमरी हेल्थ सेंटर गाठलं. आता त्याठिकाणी त्या रूग्णांची सेवा करत आहेत. डिलिव्हरी जवळ येऊनही कामावर हजर सूरतमध्ये सफाईाकामगार असणाऱ्या नैना यांची कहाणीही अशीच काहीशी आहे. सूरतमध्ये लॉकडाऊन आहे, मात्र 9 महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या नैना न चुकता कामावर पोहोचतात. त्यांची डिलिव्हरी देखील जवळ आली असली तरी त्या दिवसाचे 5-6 तास काम करतात. लोकांना लॉकडाऊनचं महत्त्व देखील पटवतात. नैना यांना पाच वर्षांची मुलगी आहे आणि नवरा स्कूल व्हॅन चालवतो. त्यांचा एकूण सहा जणांचा परिवार आहे, घरची सर्व जबाबदारी आणि काम दोन्ही जबाबदाऱ्या त्या लीलया पार पाडत आहेत. दिवसातून एकदाच होतं जेवण ही घटना आहे इंदौरमधील. तुकोगमजचे टीआय निर्मल श्रीवास यांचं घर पोलीस ठाण्यापासून जवळच आहे. मात्र तरीही रात्री ड्यूटी संपल्यावर ते घरी न जाता हॉटेलमध्ये जाऊन राहतात. दिवसातून एकदा केवळ घरी जेवायला जातात. गेल्या 5 दिवसांपासून त्यांचा हाच दिनक्रम आहे. त्यावेळीही ते घरच्यांपासून वेगळे बसूनच जेवतात. (हे वाचा-बायको-मुलांना कोरोना होऊ नये म्हणून पोलीस अधिकाऱ्याचे गॅरेज हेच घर) अशी अनेक उदाहरणं भारतामध्ये आहेत. ज्यामुळे संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे. या 'कोरोना कमांडो'मुळे देश या भीषण परिस्थितीतून मार्ग काढेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या