भोपाळ, 4 एप्रिल : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव होऊ नये यासाठी देशभरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आलं आहे. यादरम्यान अनेक कोरोना वॉरिअर्स (corona warriors) देशासाठी लढा देत आहेत. भूक-तहान विसरुन वेळेप्रसंगी कुटुंबापेक्षाही देशाला, नागरिकांच्या सुरक्षितेतेला प्राधान्य देत आहे. असेच एक वॉरिअर आहेत भोपाळचे. भोपाळ पोलीसचे सीएसपी लोकेश सिन्हा लॉकडाऊनदरम्यान ड्यूटीवर असतात. ते रात्रं-दिवस ड्यूटी करीत असतात. जसा वेळ मिळेल तसं ते आपल्या घरी येतात. मात्र यातच ते सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतात. ते दिवस-रात्र बाहेर असतात मात्र त्यांचे कुटुंबीय सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत घरा थांबलेले आहेत. अशात त्यांच्यात गेल्यामुळे त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका आहे. याची लोकेश यांना जाणीव असल्याने ते आपल्या कुटुंबाला लांबूनच डोळे भरुन पाहतात. संबंधित - दिवसा सुरक्षेचं काम, घरी परतल्यावर मास्कचं शिवणकाम, CM कडून कौतुकाची थाप सीएसपी लोकेश सिन्हा लॉकडाऊनपासून आपल्या घराच्या गॅरेजमध्ये राहत आहेत. दिवस-रात्र ड्यूटी करुन आल्यानंतर थकून आल्यानंतर ते घरात पाऊलही ठेवत नाही, आणि बायको-मुलांच्या जवळ जात नाही. घरी आल्यानंतर ते थेट गॅरेजमध्ये जातात. गेल्या 15 दिवसांपासून लोकेश सिन्हा आपल्या गॅरेजमध्ये जेवतात आणि तिथेच झोपतात. सकाळी नाश्ता आणि रात्रीच्या जेवणासाठी लोकेश आपल्या पत्नीला फोन करतात. त्यानंतर पत्नी बाहेरुनच ताट टेबलावर ठेवते. आज तक यांनी हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांची ड्यूटी एअरपोर्टवर होती. त्यामुळे त्यांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. पोलीस अधिकाऱ्यांसह वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टरांचीही हीच परिस्थिती आहे. संबंधित - भीतीदायक! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 3000 पार, 24 तासात 13 जणांचा मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.