मराठी बातम्या /बातम्या /देश /

हॉस्पिटलमध्ये घेईना, अखेर रुग्णाला घेऊन रिक्षा घातला पोलिसांच्या बॅरिकेट्सवर, अहमदाबादमधील भयावह VIDEO

हॉस्पिटलमध्ये घेईना, अखेर रुग्णाला घेऊन रिक्षा घातला पोलिसांच्या बॅरिकेट्सवर, अहमदाबादमधील भयावह VIDEO

गुजरातमध्ये आतापर्यंत 6 हजार 656 जणांचा मृत्यू (Corona Death)झाला आहे. यातील 40% टक्कांपेक्षा जास्त 2,844 मृत्यू हे अहमदाबादमध्ये झाले आहे.

  अहमदाबाद, 29 एप्रिल: देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) शेजारी असलेल्या गुजरातमध्येही (Ahmedabad) कोरोनाने हाहाकार माजवला आहे. एका रुग्णालयात जागा नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रुग्णालयात घेत नसल्यामुळे अखेर कुटुंबीयांनी रिक्षाच बॅरिकेट्स तोडून आत नेण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरातमध्ये (Gujrat) कोरोनाने हाहाकार उडाला असून हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना लवकर बेड मिळत नाहीये. अहमदाबादमध्ये 900 बेड असलेल्या रुग्णालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. रुग्णालयात जागा नसल्यामुळे अनेक जणांनी रुग्णालयाबाहेरच ठिय्या धरला आहे. गेली तीन दिवस रुग्णाला रुग्णालयात जागाच मिळत नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांच्या संतापाचा आज उद्रेक झाला. त्यामुळे त्यांनी आपल्या रुग्णाला घेऊन रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी बॅरिकेट्स लावून ठेवले आहे. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी बॅरिकेट्स तोडून जाण्याचा प्रयत्न करत आहे.

  UP : भाजप आमदाराचा कोरोनामुळं मृत्यू, बेडची मागणी करणारे पत्र Viral

  पण, पोलीस त्यांना पुढे जाऊ देत नाही. अशातच एका रुग्णासह रिक्षा बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. संतप्त झालेल्या नातेवाईकांचा उद्रेक आणि पोलिसांकडून होत असलेले अडवणूक मन हेलावून टाकणारे आहे.

  कौतुकास्पद! दागिने गहाण ठेवून दाम्पत्याने कोविड रुग्णांसाठी दिले 100 पंखे

  अहमदाबादमध्ये कोरोनामुळे मृतांचे प्रमाण हे चिंताजनक आहे. अहमदाबादेत 2500 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा दर हा 2.4% टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये आतापर्यंत 6 हजार 656 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 40% टक्कांपेक्षा जास्त  2,844 मृत्यू हे अहमदाबादमध्ये झाले आहे.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Ahmedabad, Gujrat, India, Maharashtra

  पुढील बातम्या