मराठी बातम्या /बातम्या /देश /कौतुकास्पद! दागिने गहाण ठेवून दाम्पत्याने कोविड रुग्णांसाठी दिले 100 पंखे

कौतुकास्पद! दागिने गहाण ठेवून दाम्पत्याने कोविड रुग्णांसाठी दिले 100 पंखे

मंगळवारी एका दाम्पत्याने कोईमतूर इथल्या ईएसआय कोविड रुग्णालयाला (ESI Hospital)आपले दागिने गहाण ठेवून 100 पंखे (Pedestal Fans) भेट दिले. त्यांच्या या औदार्यामुळे रुग्णालय प्रशासनाला अतिशय आनंद झालाच, पण त्यांनी दागिने गहाण ठेवून ही मदत केल्याचं समजताच सर्वांना त्यांचा अभिमान आणि कौतुक वाटलं.

पुढे वाचा ...

  कोईमतूर, 29 एप्रिल: सध्याच्या निराशाजनक, अस्थिरतेच्या काळात माणुसकीचं (Humanity) दर्शन घडवणाऱ्या अनेक घटना आशेचा किरण ठरत आहेत. देशात उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत हजारो लोकांचे मदतीचे हात पुढे येत असून, गरजू रूग्णांपर्यंत ऑक्सिजन सिलिंडर, रेमिडेसिवीर इंजेक्शन, इतरऔषधं इत्यादीची मदत पोहोचवली जात आहे. सर्वसामान्य लोकही अगदी सहजपणे दातृत्वाचे, माणुसकीचे अनोखे आदर्श समाजासमोर निर्माण करत आहेत. असंच एक असामान्य दाम्पत्य आहे कोईमतूरचे (Coimbatore). त्यांनी चक्क आपले दागिने (Jewellery) गहाण ठेवून रुग्णांसाठी 100 पंख्याची व्यवस्था केली आहे.

  द न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी एका दाम्पत्याने कोईमतूर इथल्या ईएसआय कोविड रुग्णालयाला (ESI Hospital) आपले दागिने गहाण ठेवून 100 पंखे (Pedestal Fans) भेट दिले. त्यांच्या या औदार्यामुळे रुग्णालय प्रशासनाला अतिशय आनंद झालाच, पण त्यांनी दागिने गहाण ठेवून ही मदत केल्याचं समजताच सर्वांना त्यांचा अभिमान आणि कौतुक वाटलं.

  याबाबत अधिक माहिती देताना रुग्णालयाचे डीन एम. रवींद्रन म्हणाले,‘सुरुवातीला आम्ही ही मदत स्वीकारण्यास तयार नव्हतो, परंतु देणगी (Donation) घेतल्याशिवाय हे दाम्पत्य इथून जायलाच तयार नव्हतं. या दाम्पत्याने आपले 2 लाख 20 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तारण ठेवून शंभर पंखे विकत घेतले होते. त्यामुळे आम्ही मदत घेण्यास तयार नव्हतो, पण ते दोघेही त्यांच्या निर्णयावर अगदी ठाम होते.’

  (वाचा - वाह रे पठ्ठ्या! COVID सेंटरमध्ये असूनही अभ्यास नाही थांबला,IAS अधिकारी म्हणाले..)

  अखेर रवींद्रन यांनी जिल्हाधिकारी एस. नागराजन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ही मदत स्वीकारण्याची परवानगी दिल्यावर रुग्णालयानं त्याचा स्वीकार केला. विशेष म्हणजे या दाम्पत्याला त्यांनी दिलेल्या मदतीची वाच्यता करायची नव्हती. कसलीही प्रसिद्धी नको होती. त्यामुळे त्यांनी आपली नावं गुप्त ठेवण्याची विनंती रुग्णालयाला केली. त्यांनी दिलेले 100 पंखे रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावरील कोविड रूग्णांच्या विभागात ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती रवीन्द्रन यांनी दिली. या रुग्णालयातील कोविड रुग्ण विभागात सध्या वातानूकुलन यंत्रणा सुरू करता येणार नसल्यानं 300 पंखे खरेदी करण्यात आले असून, समाजसेवा करणाऱ्या लोकांना आम्ही पंखे देण्याचं आवाहन केलं आहे, असंही रवीन्द्रन यांनी सांगितलं.

  (वाचा - Oxygen Crisis: टाटांनी पुन्हा वाढवला ऑक्सिजनच पुरवठा,600 टन ऐवजी पुरवणार 800 टन)

  मंगळवारी रात्री ईएसआय रूग्णालयानं एक निवेदन जारी करून एका शहरातील दाम्पत्याने दागदागिने गहाण ठेवून 100 पंखे देणगी दाखल दिल्याचं जाहीर केलं. हातात रोख रक्कम नसल्यानं त्यांनी दागिने गहाण ठेवून ही मदत केली असल्याचं या निवेदनात नमूद केलं आहे.

  दरम्यान, एक्सप्रेसने या जोडप्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही मदत कोविड रूग्णाच्या कल्याणासाठी करण्यात आली आहे, असं सांगत आणखी काही बोलण्यास नकार दिला.

  First published:

  Tags: Corona, Coronavirus, Covid centre, Covid-19, India