मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /धारावीकडून मुंबईकरांना 'ख्रिसमस गिफ्ट', गेल्या 24 तासांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही

धारावीकडून मुंबईकरांना 'ख्रिसमस गिफ्ट', गेल्या 24 तासांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही

धारावीत आता 88 अॅक्टिव्ह रूग्ण, दादर सेथे 458, तर माहीम येथे 272 अॅक्टिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे.

धारावीत आता 88 अॅक्टिव्ह रूग्ण, दादर सेथे 458, तर माहीम येथे 272 अॅक्टिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या एप्रिल महिन्यात कोरोनाचे पहिले आठ रुग्ण धारावी परिसरातच आढळले होते.

मुंबई, 25 डिसेंबर: मुंबई महापालिकेसाठी (Mumbai Municipal Corporation) आजचा ख्रिसमसचा (Chritsmas) दिवस अतिशय महत्त्वाचा ठरला. मुंबईच्या धारावी (Dharavi, Mumbai) परिसरातून गेल्या 24 तासांत कोरोनाचा (Coronavirus) एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या एप्रिल महिन्यात कोरोनाचे पहिले आठ रुग्ण धारावी परिसरातच आढळले होते. नंतर पाहाता पाहाता धारावी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला हेता.

हेही वाचा.. महाराष्ट्रावर नव्या कोरोनाचं संकट; शेजारील राज्यांत ब्रिटन रिटर्न कोरोना रुग्ण

आशिया खंडातील सर्वात मोठा स्लम एरिया समजला जाणारा धारावी परिसरातून कोरोनाचा समूळ नायनाट झाल्याचं म्हटलं जात आहे. धारावीकडून मुंबईकरांना ख्रिसमस गिफ्ट मिळालं आहे, अशीही जोरदार चर्चा आहे.

धारावी परिसरात गेल्या 24 तासांत कोरोनाचा एकही पॉजिटिव्ह रुग्ण आढळला नाही. गेल्या एप्रिलनंतर असं पहिल्यांदाच घडलं आहे. 2.5 वर्गकिलोमीटर परिसरात वसलेल्या धारावीमध्ये 6.5 लाखांहून अधिक लोक वास्तव्य करतात. धारावीत एप्रिल महिन्यात पहिल्यांदा आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले होते. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ झाली होती. एकट्या धारावीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 3788 वर पोहोचली होती. सध्या धारावीत 10 पेक्षाही कमी कोरोनाबाधित रुग्णसंख्या आहे. या रुग्णांवर उपचार सुरू असून ते लवकरच बरे होऊन घरी जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा..'राजा उदार नाही तर उधार झाला', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

दादरमध्ये गेल्या 24 तासांत 8 कोरोनाबाधित नव्या रुग्णांची भर पडली आहे. दादरमध्ये एकूण रुग्णसंख्या 4750 वर पोहोचली आहे. तर माहिममध्ये आज 6 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. माहिममध्ये एकूण 4561 कोरोना रुग्ण आहेत.

दरम्यान, 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत 45 नागरिक ब्रिटनमधून कल्याणमध्ये परतले आहेत. त्यांच्या नावाची यादी राज्य सरकारने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे सुपूर्द केली आहेत.  या सर्वांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नागपुरात इंग्लडहून परत आलेल्या एका तरुणाचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Dharavi, Mumbai