Home /News /entertainment /

VIDEO: ‘लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त काय मिस केलं?’ नेटिझन्सनी डोक्यावर घेतलंय रणबीरचं उत्तर

VIDEO: ‘लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त काय मिस केलं?’ नेटिझन्सनी डोक्यावर घेतलंय रणबीरचं उत्तर

लॉकडाऊनच्या काळात काय मिसं केलं असा प्रसंग त्याला या कार्यक्रमात राजीव मसंद (Rajeev Masand) यांनी रणबीरला ( Ranbir Kappor) विचारला होता. त्यावर रणबीरने दिलेलं उत्तर व्हायरल झालं असून सर्वांनीच त्याच्या विचाराला दाद दिली आहे.

    मुंबई, 25 डिसेंबर : बॉलिवूडचा कलाकार  रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा आलिया भट्शी  (Alia Bhatt) असलेल्या रिलेशनशिपमुळे कायम चर्चेत असतो. नुकत्याच News 18 ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये त्याने आलियासोबतची रिलेशनशीप, लग्नाचे प्लॅन ,आगामी प्रोजेक्ट आणि लॉकडाऊनमधील अनुभव याबाबत मनमोकळी उत्तरं दिली आहेत. लॉकडाऊनच्या काळात काय मिसं केलं असा प्रसंग त्याला या कार्यक्रमात राजीव मसंद (Rajeev Masand) यांनी रणबीरला विचारला होता. त्यावर रणबीरने दिलेलं उत्तर व्हायरल झालं असून सर्वांनीच त्याच्या विचाराला दाद दिली आहे. काय म्हणाला रणबीर? लॉकडाऊनच्या काळात घरात स्वस्थ बसण्याची किंवा काही न केलं तरी चालू शकेल अशापैकी मी देखील एक 'privilege ' आहे. या काळात अनेकांनी खूप सोसलं आहे. त्यामुळे त्या परिस्थितीवर माझ्यासारख्या व्यक्तीनं बोलणं योग्य नाही, असं उत्तर रणबीरनं दिलं आहे. स्वत:च्या आणि इतरांच्या परिस्थितीची योग्य जाणीव ठेवून रणबीरनं दिलेलं हे उत्तर इंटरनेटवर त्याच्या फॅन्सनी डोक्यावर घेतलं आहे. रणबीर आता लवकरच दिग्दर्शक आयन मुखर्जीच्या (Ayan Mukerji) ब्रह्मास्त्र (Brahamstra) या सिनेमात सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. मार्व्हल सीरिजच्या आयर्न मॅन (Iron Man) या सुपर हिरोचा आपण खूप मोठा फॅन असल्याचं रणबीरंनं यावेळी सांगितले. आलियाशी लग्न कधी करणार? रणबीरनं नुकतचं आलिया भटशी या वर्षी लग्न का केलं नाही हे सांगितले होते ‘मी आलिया भट्टशी लग्न करायला तयार आहे. 2020 मध्येच मला लग्न करायचं होतं पण कोरोनामुळे (Corona) सगळीच वाट लागली. आलिया भट्ट वयाने लहान असली तरी तिने कमी वयात खूप यश संपादन केलं आहे. मला तिचा अभिमान आहे,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यामुळे आता 2021 मध्ये रणवीर आणि आलिया या इंडस्ट्रीमधील सर्वात चर्चित जोडप्याचं लग्न होणार का? याकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलेलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Alia Bhatt, Ranbir kapoor

    पुढील बातम्या