पालीताना, 03 जून : निसर्ग चक्रीवादळाचा धोका गुजरातसह महाराष्ट्राला आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता हे वादळ अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. या वादळादरम्यान अंगावर शहारे आणणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. चक्रीवादळामुळे विजांच्या क़डकडाटासह अनेक भागांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. त्याचवेळी वीज एका झाडावर कोसळते आणि आग लागते. अंगावर शहारे आणणारा हा थरारक व्हिडीओ गुजरातमधील पालीताना या परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये झाडावर वीज कशी कोसळते ते दिसत आहे.
Eye diameter is about 65 km as observed through Radar. thus the diameter has decrease during past 01 hour indicating intensification of system. hence wind speed has increased from 85-95 kmph to 90-100 kmph gusting to 110 kmph.
— India Meteorological Department (@Indiametdept) June 3, 2020
संबंधित- किती वर्षानंतर धडकणार मुंबईत चक्रीवादळ, नेमकं काय घडलं होतं 1948 ला! गुजरातमध्ये निसर्ग चक्रीवादळाचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आहे. गुजरातमध्ये समुद्रकिनाऱ्यावर एनडीआरएफ, कोस्टगार्ड आणि पोलीस तैनात करण्यात आले आहे. सागरी किनाऱ्यालगच्या गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढला आहे. 90 ते 100 किलोमीट ताशी वेगानं वारे वाहात आहेत त्याचा वेग 190 पर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. संबंधित- LIVE : मुंबईत दुपारी चक्रीवाद धडकणार, 110 KMPH वेगानं वारे वाहण्याची शक्यता संबंधित- निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात कुठे आणि कधी धडकणार? पाहा हवामानाचा LIVE VIDEO

)







