Home /News /mumbai /

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात कुठे आणि कधी धडकणार? पाहा हवामानाचा LIVE VIDEO

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात कुठे आणि कधी धडकणार? पाहा हवामानाचा LIVE VIDEO

कोरोना व्हायरसशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रापुढे निसर्ग चक्रीवादळाचे संकट येऊन उभे ठाकले आहे.

    मुंबई, 03 जून : कोरोना व्हायरसशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रापुढे निसर्ग चक्रीवादळाचे संकट येऊन उभे ठाकले आहे. अवघ्या काही तासांत निसर्ग चक्रीवादळ (nisarga cyclone) अलिबागच्या दिशेनं घोंघावत येत आहे. आज सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हे वादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. याचा फटका मुंबईसह अन्य जिल्ह्यांना बसणार आहे. हे वादळ जवळपास 120 किमी वेगाने महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे. windy.com नावाचे हे एक हवामानातील बदलाची माहिती देणारी वेबसाईट आहे. या वेबसाईटवर निसर्ग चक्रीवादळ कुठे, कधी आणि केंव्हा धडकणार याचे LIVE अपडेट्स तुम्हाला पाहाता येईल. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाने अलिबागच्या दिशेनं कूच केली आहे. थोड्यात वेळात हे वादळ धडकणार आहे.  हे वादळ जेव्हा धडकेल तेव्हा ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. इतिहासात पहिल्यांदाच मुंबईला (mumbai)  मोठा वादळ आणि मुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आहे. अलिबाग, ठाल नव्हंगाव आणि किहीम समुद्रकिनाऱ्याला या (nisarga cyclone) वादळाचा मोठा धोका आहे. मुंबई पालिकेकडून अलर्ट भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज 3 जून 2020 रोजी 'निसर्ग' चक्रीवादळ मुंबईत धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली असून सध्या मुंबईतील काही भागात पाऊस सुरू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असं आवाहन महापालिकेद्वारे यापूर्वीच करण्यात आले आहे. हेही वाचा - LIVE UPDATES : रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, काही तासांत वादळ धडकणार जरी गरजेपोटी घराबाहेर पडायचे झाल्यास व चारचाकी वाहनाने प्रवास करावयाचा असेल तर खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रवास करण्यापूर्वी गाडीमध्ये काच फोडता येईल, असे हातोडा, स्टेपनी पान्हा यासारखे एखादे साधन ठेवण्यास विसरू नये. तसंच हे साधन गाडीच्या डिकीत न ठेवता गाडी चालकाला सहजपणे हाताला लागेल अशाप्रकारे ठेवावे; असेही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे आवर्जून कळविण्यात येत आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या